Principal Sureshchandra Jain esakal
जळगाव

Jalgaon Bribe Crime : झोनल ट्रेनिंग सेंटरला दोघे लाचखोर निलंबित; प्राचार्यासह लिपिकाचा समावेश

Bribe Crime : मध्य रेल्वेच्या तालुक्यातील झोनल ट्रेनिंग सेंटरला अक्षय चौधरी यांचे वाहन टेंडर संपल्याने लॉक बुक वर सही करण्यासाठी नऊ हजार रुपयांची मागणी प्राचार्य सुरेशचंद्र जैन व क्लर्क योगेश देशमुख यांनी (ता.६) केली होती.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Bribe Crime : मध्य रेल्वेच्या तालुक्यातील झोनल ट्रेनिंग सेंटरला अक्षय चौधरी यांचे वाहन टेंडर संपल्याने लॉक बुक वर सही करण्यासाठी नऊ हजार रुपयांची मागणी प्राचार्य सुरेशचंद्र जैन व क्लर्क योगेश देशमुख यांनी (ता.६) केली होती.चौधरी यांच्या तक्रारीवरून रंगेहात लाच स्विकारतांना सी.बी.आय.पथकाने संशयित दोघांना अटक केली होती. दोघे लाचखोरांना वरिष्ठ पातळीवरून निलंबित करण्यात आले. (jalgaon Two bribe takers suspended marathi news)

याप्रकरणी झोनल ट्रेनिंग सेंटरला बुधवारी (ता.६( मार्चला दुपारी १२ वाजेला पुण्यातील सीबीआय पथकाने झेडटीआरआयचे प्राचार्य सह कार्यालयीन अधीक्षकांना पैसे घेतांना अटक केली होती.अटकेनंतर ४८ तास संशयित सीबीआयच्या ताब्यात चौकशी कामी असल्याने रेल्वे प्रशासनाने दोघांना निलंबित केल्याचे सूत्रांनी सांगितले. कार्यालयीन अधीक्षक (निविदा) योगेश देशमुख आणि प्राचार्य सुरेशचंद्र जैन अशी निलंबित संशयितांची नावे आहेत.

बिलाचा निपटारा करण्यासाठी ...

प्राचार्य सुरेशचंद्र जैन कडून दहा हजार रुपये लाचेची मागणी झाली होती मात्र ९ हजारात तडजोड झाली. तक्रारदाराला पैसे द्यायचे नसल्याने त्यांनी पुणे सीबीआयशी संपर्क साधला व तक्रार दाखल केल्यानंतर सापळा रचण्यात आला. (latest marathi news)

सभागृहात प्रवेश करून बसताच सीबीआयच्या पथकाने दोघांनाही रंगेहात पकडले. दरम्यान, न्यायालयाने संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्यानंतर सुरुवातीला त्यांना दोन दिवस सीबीआय कोठडीत पाठवून सोमवारी जामीन मंजूर केला.

दोघांची जामिनावर सुटका...

अटकेत असलेले कार्यालयीन अधीक्षक (निविदा) योगेश देशमुख आणि प्राचार्य सुरेशचंद्र जैन यांनी जामीन अर्ज दाखल केल्यानंतर सोमवारी ही परवानगी देण्यात आली.२० हजार रुपयांचा बाँड आणि दोन्ही संशयितांना ५० हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. अँड.शर्मा,ॲड.केतन ढाके यांनी कामाची पाहणी केली.

दोन्ही संशयितांचे निलंबन...

रेल्वेच्या अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार झोनल ट्रेनिंग सेंटरचे प्राचार्य सुरेशचंद्र जैन आणि कार्यालयीन अधीक्षक योगेश देशमुख यांना लाच प्रकरणात वरिष्ठ पातळीवरून निलंबित करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Drought Relief: पाच हजारांची मदत ७३ लाख शेतकऱ्यांना;फडणवीस : उर्वरितांना दोन दिवसांत रक्कम मिळणार

Satara Farmer Loan Waiver: सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ३४ हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ, चौथी यादी जाहीर

Navi Mumbai: माजी मंत्र्याचा अनधिकृत कारभार? मोरबे धरण क्षेत्रात अलिशान फार्म हाऊसची उभारणी, नवा वाद पेटण्याची शक्यता

Latest Marathi News Live Update : बॅलेट पेपर वापरूनही काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही, तर तुमची मागणी मागे घ्याल का? - अश्विनी वैष्णव

IPL 2027 Trade: चेन्नई सुपर किंग्सने हार्दिक पांड्याला 'ठेंगा' दाखवला; SRH चे दोन तगडे खेळाडू आपल्या संघात घेतले, त्याबदल्यात कोणाला दिले?

SCROLL FOR NEXT