the beaten path esakal
जळगाव

Jalgaon News : असोद्यात रस्ताच खचला! रस्त्याखाली पोकळ जागा

Jalgaon : जळगाव-असोदा रस्त्यावरील खारडोहाला लागून असलेला दोन फुटांचा रस्ता चार फूटापर्यंत खाली खचला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जळगाव-असोदा रस्त्यावरील खारडोहाला लागून असलेला दोन फुटांचा रस्ता चार फूटापर्यंत खाली खचला आहे. खचलेल्या ठिकाणच्या खालचा भाग अत्यंत पोकळ असून, त्याठिकाणाहून मोरीचा रस्ता काढला आहे. रस्ता खचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. शंभर फूट खोल खारीडोहावर संरक्षक भिंत नाही, पथदीपही नाहीत. या स्थितीत पुढे अधिक पाऊस झाल्यास हा रस्ताही अजून खचण्याची भिती वाढली आहे. (two feet road has sunk down to four feet )

अडीच वर्षांपूर्वी या राज्य मार्गाची बांधणी करण्यात आली आहे. बांधणीवेळी खारीडोहात साचणारे पाणी व जळगावकडून वाहून येणारे शेतांच्या पाण्याचा अंदाज न घेता खारडोहाच्या परिसरात मोऱ्या बांधण्यात आल्या आहेत. यातच समोरील बांधकामेही उंचावर झाल्याने हा उतार अधिकच वाढला आहे. या राज्य मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली आहे. या रस्त्याच्या बाजूने असलेली काटेरी झुडपे वाहतुकीस अडथळा ठरत आहेत. (latest marathi news)

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून झुडपे कापली जात नाहीत. गेल्या वर्षीही याच ठिकाणी असाच खड्डा पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. मागील दोन दिवसांत झालेल्या किरकोळ पावसाने हा रस्ता पुन्हा खचला आहे. रस्ता खचल्यावर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी धोक्याच्या ठिकाणी वाहनधारकांना सावधतेने वाहतूक करण्याची जनजागृती केली. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केवळ रेडियमच्या सावधपट्ट्या चिटकविण्याचा सोपस्कार करण्यात आला.

१५ वर्षांपूर्वी पाणी अडविण्यासाठी खारीडोह खोल करण्यात आला होता. मात्र, तो मातीने पुन्हा भरला आहे. यामुळे पाणीसाठाही कमी झाला आहे. यामुळे खारडोहाची खोली वाढविण्यासह याठिकाणावर संरक्षक भिंत उभारावी, यासह प्रखर रेडियम, पथदीप लावून माहिती दर्शक फलक लावावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT