Shaheen Begum Ajmal Khan esakal
जळगाव

Jalgaon News : पवित्र हज यात्रेतच जळगावच्या दोघांचा मृत्यू; उच्चांकी तापमानाचा भाविकांना फटका

Jalgaon : सौदी अरबच्या मक्का-मदिना येथे पवित्र हज यात्रेसाठी गेलेल्या जळगावच्या दोन भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : सौदी अरबच्या मक्का-मदिना येथे पवित्र हज यात्रेसाठी गेलेल्या जळगावच्या दोन भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. गेल्या आठवड्यात उच्चांकी तापमानामुळे अनेक भाविकांना प्राण गमवावे लागले होते, त्यानंतर ही घटना घडली आहे. जळगाव शहरातील शिवाजीनगरच्या मागील उस्मानिया पार्क, अली मियानगर येथे डॉ. उमर देशमुख कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. ( Two people died during holy Hajj pilgrimage )

त्यांचे वडील अब्दुल रफिक देशमुख (वय ६५), आई शाहीन बेगम अब्दुल रफिक देशमुख (६१) हे दोघे हज यात्रेसाठी गेले होते. मीना शहरात असताना उच्चांकी तापमानामुळे शाहीन बेगम यांची प्रकृती खराब झाली. त्यांच्यावर उपचार सुरू असताना रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्युमुळे देशमुख परिवारावर शोककळा पसरली आहे. शाहीन बेगम यांच्या मागे पती, तीन भाऊ असा परिवार आहे. (latest marathi news)

पत्नीच्या शोधात पतीचा मृत्यू

पिंप्राळा हुडको भागात गुलशन रजा कॉलनीत राहणारे अजमल खान अफजल खान (वय ५४) हे पत्नी शबानाबी खान यांच्यासह हज यात्रेला गेले होते. अजमल खान सिल्लोड (जि. छत्रपती संभाजीनगर) येथील नॅशनल ऊर्दू हायस्कूलचे शिक्षक आहेत. सौदी अरेबिया येथे मीना परिसरात त्यांना चक्कर आली. त्याठिकाणी काही वेळ पत्नी शबानाबी यांच्यापासून त्यांची ताटातूट झाली. मात्र, थोड्या वेळाने शबानाबी यांना शोधत असताना अजमल खान यांना चक्कर आल्यावर त्यांची प्रकृती खालावली. वेळीच उपचार न मिळाल्याने अजमल खान यांचा मृत्यू झाल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT