onion crop esakal
जळगाव

Jalgaon News: अमळनेर तालुक्यात अवकाळी पावसाने कांद्याच्या उत्पादनात घट! लावलेला खर्चही न निघाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी

Jalgaon News : कांदा एका एकरात ८० ते १०० क्विंटलच्या जवळपास होत असतो. परंतु, यावर्षी अवकाळी पाऊस आल्याने कांदा पिकाच्या उत्पादनात झालेली आहे.

किशोर पाटील

वावडे (ता. अमळनेर) : अमळनेर तालुक्यात कांद्याची उन्हाळी पीक म्हणून मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. कांदा हे पीक चार महिन्यांचे आहे. जानेवारी ते फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कांदा पिकाची लागवड करतात, तर एप्रिल ते मे महिन्यामध्ये कांदा काढण्यास सुरुवात होते. परंतु, यावर्षी कांद्याच्या उत्पादनात मोठी घट झाल्याचे दिसून येते. तसे पाहता कांदा एका एकरात ८० ते १०० क्विंटलच्या जवळपास होत असतो. परंतु, यावर्षी अवकाळी पाऊस आल्याने कांदा पिकाच्या उत्पादनात झालेली आहे. (Jalgaon Unseasonal rain in Amalner taluka)

अवकाळी पावसाने अनेकदा हजेरी लावल्याने व शेतजमिनीतच पाणी साचून राहिल्याने जमिनीमध्येच कांदा सडला. शिवाय पिकावर रोग आल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी ‘सकाळ’ला सांगितले. कपाशीप्रमाणेच कांदा हे पीकदेखील आहे.

शेतकऱ्यांचं नगदी पीक म्हणून कांदाही ओळखले जाते. परंतु, यावर्षी खरिपाची पेरणी कशी करावी, असा प्रश्नदेखील यानिमित्ताने शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेला आहे. पाहिजे त्या प्रमाणात भावसुद्धा मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांतच पाणी आलेले दिसून येत आहे.

मोठी आर्थिक कोंडी

साधारण कांदा पिकाला ८०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल एवढा भाव मिळतो. त्यानुसार एका एकरामध्ये जवळपास ८० ते १०० क्विंटल कांदा झाल्यास शेतकऱ्यांना आपल्या पुढील खरीप हंगामासाठी व उदरनिर्वाहासाठी पैसे राहतात. मात्र, यावर्षी अवकाळी पावसाने कांदा पिकात मोठ्या प्रमाणात घट झालेली दिसून येत आहे. त्याचा विपरीत परिणाम म्हणून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी झालेली दिसून येत आहे. (latest marathi news)

कांदा पिकाला आलेला एकरी खर्च

नागरणी : सातशे रुपये

वखरणी : सातशे रुपये

वाढून काढणे : सातशे रुपये

बियाणे : एक हजार रुपये

लागवड : दहा हजार रुपये

खते : पाच हजार रुपये

फवारणी : पाच हजार रुपये

निंदण : दोन हजार रुपये

काढणी खर्च : दहा हजार रुपये

एकूण खर्च : ३५ हजार शंभर रुपये

"अवकाळी पावसामुळे कांदा पीक शेतजमिनीतच सडला. सोबतच अज्ञात रोगाने कांदा पीक नष्ट झाले. कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले व पर्यायाने कांदा उत्पादनातदेखील कमालीची घट झालेली आहे. होणारे उत्पन्न व लागलेला खर्चाचा हिशोब केला तर लावलेले पैसेसुद्धा निघताना दिसत नाहीत. त्यामुळे शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्याची गरज आहे."

- मनोहर किसनराव पाटील, कांदा उत्पादक शेतकरी, मांडळ (ता. अमळनेर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तिकीट कापलं जाण्याची भीती, आमदाराचं मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन; ट्रेनमध्ये 'अंडरवेअर कांड'मुळे होते चर्चेत

अमिताभ यांना उद्धटपणे बोलणाऱ्या इशितप्रमाणे 'या' मुलाने सुद्धा ओव्हर कॉन्फिडन्समध्ये गमावलेले लाखो, एक करोडचा प्रश्न चुकला

Palghar News:'हजारो आदिवासी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले'; घोषणाबाजीने कार्यालय दुमदूमले, सरकारचे लक्ष वेधणार

Giorgia Meloni : खूप सुंदर आहात, फक्त सिगारेट ओढू नका; PM मेलोनी यांना मिळाला सल्ला, इटलीच्या पंतप्रधान कोणती सिगारेट ओढतात?

अधुरी एक कहाणी...आज 'या' राजघराण्याच्या सुनबाई असत्या लता मंगेशकर ! अखेरपर्यंत दोघंही राहिले अविवाहित

SCROLL FOR NEXT