death esakal
जळगाव

Jalgaon Accident News: दोन दुचाकींच्या धडकेत वरणगावचा तरुण ठार! दोघे जखमी; वरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल

Accident News : या अपघातात दोन जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी (ता. २०) रात्री साडेबाराच्या सुमारास घडली. याबाबत वरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

वरणगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर कपिल वस्तीजवळ रात्री उलट्या बाजूने भरधाव येणाऱ्या दुचाकीने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात वरणगाव येथील दुचाकीस्वार तरुण ठार झाला. दादाराव नारायण जमदाडे (वय ३६, मूळ रा. मन्यारखेडा, ह.मु. वामननगर, वरणगाव) असे मृताचे नाव आहे. या अपघातात दोन जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी (ता. २०) रात्री साडेबाराच्या सुमारास घडली. याबाबत वरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. (Jalgaon Varangaon youth killed in collision between two bikes)

दादाराव दुचाकीने (एमएच १९, एएच ४७३९) दीपनगर येथून रात्री बाराला ड्यूटीवरून घरी वरणगावला येत होता. त्यास समोरून आलेल्या हिरोहोंडा शाईन कंपनीच्या दुचाकीवरील (एमएच १९, डीए ७९२६) चालक साजीद अहमद (पूर्ण नाव माहीत नाही) याने उलट्या बाजूने भरधाव चालवीत धडक दिली.

त्यात दादाराव नारायण जमदाडे यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर साजीद अहमद याच्यासह त्याच्यासोबत असलेला इसम (नाव गाव माहीत नाही) जखमी झाले. याबाबत सूर्यभान भिवराव जमदाडे (वय ३४, रा. मन्यारखेडा ता. भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरणगाव पोलिस ठाण्यात साजीद अहमदविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक गणेश देशमुख, एएसआय मनोहर पाटील व प्रमोद कंखरे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT