Tehsildar Dr. While giving a statement to Ulhas Devare, Nationalist Congress Party Sharad Chandra Pawar Women's Front Leader Varsha Patil, Taluka President Suvarna Patil, City President Annapurna Patil, Adv. Swati Shinde etc. esakal
जळगाव

Jalgaon: योजनांचा गाजावाजा मात्र, लाडकी बहीण असुरक्षित : वर्षा पाटील; अत्याचाराविरोधात NCP शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आक्रमक

Jalgaon News : महिलांवर होणारे हल्ले, खून यामुळे महिलांच्या सुरक्षेतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुरुवारी (ता.१) रस्त्यावर येऊन निषेध केला.

सकाळ वृत्तसेवा

पारोळा : महिन्याभरापासून शासनाने महिला, युवक व ज्येष्ठांसाठी अनेक ‘लाडक्या’ योजना आणल्यात. मात्र, वित्त विभागाने निधीबाबत राज्य सरकारलाच घरचा आहेर दिला. राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना भारतीय लोकशाहीला काळिमा फासणाऱ्या आहेत. म्हणून उरण व शिळफाटा येथील कुटुंबीयांना सरकारने न्याय द्यावा, तरच लाडकी बहीण राज्यात सुरक्षित राहील.

महिलांवर होणारे हल्ले, खून यामुळे महिलांच्या सुरक्षेतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुरुवारी (ता.१) रस्त्यावर येऊन निषेध केला. त्यानंतर महिला आघाडीच्या नेत्या वर्षा पाटील यांच्या नेतृत्वात तहसीलदार डॉ. उल्हास देवरे यांना निवेदन देण्यात आले. (Varsha Patil NCP Sharad Pawar Women Aggressive Against problems)

महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी येथील महामार्ग ५३पासून मोर्चा काढला. हा मोर्चा तहसील कार्यालयावर काढला. यावेळी तहसीलदार डॉ. उल्हास देवरे, नायब तहसीलदार शांताराम पाटील यांना आघाडीच्या नेत्या वर्षा पाटील व तालुकाध्यक्षा सुवर्णा पाटील पदाधिकाऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली, तर दुसरीकडे लाडक्या बहिणींवरच अत्याचाराच्या घटनांत वाढत आहेत. गेल्या महिन्यात उरण व शिळफाटा येथे घडलेल्या अत्याचाराच्या घटना माणुसकीला काळिमा फासणाऱ्या व महिलांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याची दर्शवणाऱ्या आहेत.

त्यात उरणची यशस्वी शिंदे या बावीसवर्षीय तरुणीची एकतर्फी प्रेमातून निघृणहत्या केल्याची घटना घडली. उत्तर प्रदेशातील मंदिरातील घटनाही धक्का देणाऱ्या असल्याने त्यांच्या निषेधार्थ मोर्चा काढीत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

राज्यात उरण व शिळफाटा या दोन्ही घटनांचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या मोर्चात सहभाग घेतला. यावेळी विद्यार्थिनींनी कायदा व सुव्यवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली. (latest marathi news)

जलद न्यायालयात खटला चालवा

उरण व शिळफाटा येथील घटना अत्यंत निंदनीय आहे. या दोन्ही घटना अमानवी आहेत. म्हणून या खटल्याची सुनावणी जलद न्यायालयात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली.

निवेदन देताना महिला आघाडीच्या नेत्या वर्षा पाटील, तालुकाध्यक्ष सुवर्णा पाटील, ॲड. स्वाती शिंदे, शहराध्यक्ष अन्नपूर्णा पाटील, सरपंच ज्योती संदानशिव, योगिता शिंपी, जानवी पाटील, छाया पाटील, माधुरी सोनार, ग्रामपंचायत सदस्या दगू पवार, सुषमा चौधरी, रेखा सोनवणे, द्वारका पाटील यांच्यासह महाविद्यालयीन विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

Kannad Nagarparishad Election : कन्नडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांचा युतीचा फॉर्म्युला ठरला; जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांची माहिती

Dharur Nagarparishad Election : धारूर नगरपरिषदेत चौरंगी लढत रंगणार! अध्यक्षपदासाठी १६, तर नगरसेवक पदासाठी तब्बल १५१ नामनिर्देशन पत्र दाखल

Latest Marathi Breaking News: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Drone Delivery Service: दूध, किराणा, पॅकेजेस… सगळं थेट ड्रोनने घरी पोहोचणार! मुंबईत पहिली निवासी ड्रोन डिलिव्हरी सेवा सुरू होणार, पण कधी?

SCROLL FOR NEXT