fire audit fire audit
जळगाव

जळगाव : जिल्हा ग्रामीणसह उपजिल्हा रुग्णालयांचे फायर ऑडिट

पाच कोटी खर्च; बांधकाम विभागाकडून मंजुरीची प्रतीक्षा कायम

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयांसह उपजिल्हा रुग्णालयाचे फायर ऑडिट झाले आहे. त्यासाठी सुमारे पाच कोटींचा खर्च झाला आहे. या खर्चाला सार्वजनिक बांधकाम विभागाची एनओसी मिळालेली नसल्याने संबंधितांना खर्च देण्यात आलेला नाही.

अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयाला शनिवारी (ता. ६) शॉटसर्किटने आग लागून अकरा जणांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयांचे फायर ऑडिट झाले आहे की नाही, याबाबत माहिती घेतली असता, वरील बाब समोर आली.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांच्या अधिपत्याखाली येणाऱ्या ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयात शासनाच्या आदेशाद्वारे फायर ऑडिट करण्यात आले होते. त्यातील त्रुटी दूर करून त्या जागी नवीन यंत्रणा बसविली होती. मुक्ताईनगर, जामनेर, जामनेर, चोपडा या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय आहे. तर ग्रामीण रुग्णालये अकरा आहेत. त्यात फायर ऑडिट करून आग लागली तर कशामुळे लागेल, ती लागू नये, यासाठी कोणत्या योजना आहेत किंवा कराव्या लागतील, याबाबत निरीक्षण करून योजना कार्यान्वित करण्यात आल्या. यामुळे सर्व ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालये आगीच्या धोक्यापासून दूर आहेत. या सर्व ठिकाणच्या ऑडिटसाठी पाच कोटींचा खर्च आला आहे. टेंडर मंजुरीसाठी शासनाकडे पाठविले होते. त्यांनी बांधकाम विभागाकडून याबाबत एनओसी घेऊन शासनाकडे पाठविणे, निधी आला की पेमेंट अदा होईल, असे सांगण्यात आले आहे.

जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे फायर ऑडिट मार्च, एप्रिलमध्येच डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या कार्यकाळात झाले. त्यांनी डॉ. श्रीकृष्ण चव्हाण, डॉ. डॅनियल साजी, डीन कार्यलयाचे राजेंद्र वैद्य यांचे पॅनल बनविले होते. राज्य शासनाकडून एक टीम आली तिने हे ऑडिट पूर्ण केले होते.

जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयांचे फायर ऑडिट पूर्ण झाले आहे. आगीपासून या रुग्णालयांना धोका नाही. ज्यांनी ऑडिट केले, त्यांचे टेंडर शासनाकडे पाठविले आहे. शासनाकडून निधी आल्यावर पेमेंट अदा केले जाईल.

- डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT