Water Crisis Sakal
जळगाव

Jalgaon Water Crisis: निम्मा जिल्हा पाणी टंचाईच्या गर्गेत! पावसाअभावी पाणी कपात सुरू

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Water Crisis : अलनिनोच्या प्रभावामुळे मान्सून रोखला गेला आहे. परिणामी जिल्ह्यात पाउस पडत नसल्याचे चित्र आहे. जो पडतो, तो अल्प आहे. यामुळे पावसाळ्याचे तीन महिने उलटत आले, तरी पन्नास टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांत आहे.

आगामी काळात पाऊस पडेल किंवा नाही हे सांगता येत नसल्याने जिल्हा प्रशासनाने आगामी काळातील दक्षता म्हणून महापालिका, पालिका, नगरपरिषदांना पाणी कपातीचे आदेश दिले आहेत.

पावसाळा असूनही निम्म्या जिल्ह्यात चार ते बारा दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. (Jalgaon Water Crisis Half of district in grip of water shortage Water shortage started due to lack of rain)

अलनिनोमुळे यंदा मान्सूनची तब्बल २५ दिवस उशिराने (२५ जून) वाटचाल सुरू झाली. जुलैत पावसाने भर काढली खरी, मात्र चार ऑगस्टपासून पावसाने पाठ फिरविली.

तीन- चार आठवडे झाले, तरी दमदार पाउस झालेला नाही. जो पडतो तो काही तासच. यामुळे धरणांमध्ये पाणी साठा वाढत नसल्याचे चित्र आहे.

अलनिनोचा प्रभाव कायम

पावसाअभावी पिकेही करपू लागली आहेत. पिकांची वाढ खुंटली आहे. काही ठिकाणी विहिरीतील पाण्यावर पिके वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करताना दिसतात. वाढ खुंटल्याने पिकांना फुले, शेंगा लागत नाहीत.

आतापर्यंत गूडघ्यापर्यंत कपाशीचे पिक होणे अपेक्षीत होते. मात्र, एक फुटापर्यंत कपाशीची वाढ झालेली आहे. पाऊस पडण्यासाठी सर्वत्र प्रार्थना होताहेत, मात्र अलनिनोचा प्रभाव कायम आहे.

भुसावळ-रावेर सुखी

जिल्ह्यात भुसावळ पट्ट्यातील रावेर तालुक्यात गंगापूर, सुकी, मंगरूळ, मोर (यावल) ही मध्यम प्रकल्पं व पाझर तलाव फुल्ल भरले आहेत. यामुळे या दोन तालुक्यांना पाणी टंचाईचा धोका नाही. विशेष म्हणजे या तालुक्यांत उन्हाळ्यात टँकरही लागत नसल्याचे चित्र आहे.

भुसावळ शहराला तापीनदीतून पाणी पुरवठा होतो. जी गावाजवळून वाहते. चोवीस तास नदीला पाणी असते.

मात्र, पालिकेच्या भोंगळ कारभाराने नागरिकांना दहा ते बारा दिवसाआड पाणी पुरवठा होतो. उन्हाळ्यातही बारा ते पंधरा दिवसाआड पाणी पुरवठा केला जात होतो. पाण्याबाबत भुसावळकरांना उन्हाळा आणि पावसाळा सारखाच आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

जिल्ह्यात होणारा पाणी पुरवठा असा

गाव दिवसाआड

जळगाव ४

भुसावळ १० ते १२

बोदवड १०

रावेर १

यावल १

सावदा १

मुक्ताईनगर १

पाचोरा ४

भडगाव ३

चाळीसगाव ४

अमळनेर ४

चोपडा ४

पारोळा १३

धरणगाव ९

जामनेर ३

एरंडोल ३

भुसावळला नदी ‘उशाशी’ अन...

भुसावळ शहराला पावसाळ्यातही दहा ते बारा दिवसाआड पाणी पुरवठा होतोय. वास्तविक तापी नदी भुसावळजवळून जाते. नदीपात्रातूनच पाणी उचलून ते शुद्ध करून नागरिकांना पुरविले जाते.

सध्या नदीतून पाणी वाहून जाते. मात्र, भुसावळकरांना दहा ते बारा दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. भुसावळला हतनूर धरण आहे. त्यातूनच तापीनदीत पाणी सोडले जाते.

पावसाळ्यात भुसावळकरांना पाणी टंचाईला जावे लागते. जे पालिका प्रशासनाचे अपयश आहे. त्यामानाने हतनूर धरणाचे पाणी घेणाऱ्या रावेर, यावल तालुक्यांत एक दिवसाआड पाणी येते.

मोठ्या धरणातील पाणीसाठा असा

धरण पाणीसाठा (टक्के)

हतनूर ३७.२५

गिरणा ३४.१३

वाघूर ५७.०८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT