Water Scarcity esakal
जळगाव

Jalgaon Water Scarcity: एरंडोल तालुक्यात 8 गावांत पाण्याची टंचाई! खासगी विहिरी अधिग्रहित; शहरात 6 ते 8 दिवसांआड पाणीपुरवठा

Water Crisis : टंचाईग्रस्त आठ गावांत खासगी विहिरी अधिग्रहित करून ग्रामस्थांना पाणीपुरवठा केला जात आहे

आल्हाद जोशी

एरंडोल : तालुक्यातील आठ गावांत पाण्याची गंभीर समस्या निर्माण झालेली आहे. एरंडोल शहरातदेखील सहा ते आठ दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. दरम्यान, टंचाईग्रस्त आठ गावांत खासगी विहिरी अधिग्रहित करून ग्रामस्थांना पाणीपुरवठा केला जात आहे. पावसाळा लांबल्यास शहरासह ग्रामीण भागात पाण्याची गंभीर समस्या निर्माण होण्याची भीती आहे. (Jalgaon Water scarcity in 8 villages in Erandol taluka)

तालुक्यातील पिंप्री बुद्रुक, पिंप्री प्र.चा., विखरण, अंतुर्ली, आडगाव, चोरटक्की, तळई, पिंपळकोठा खुर्द या आठ गावांत पाण्याची गंभीर समस्या निर्माण झालेली आहे. त्यामुळे प्रशासनातर्फे खासगी विहिरी अधिग्रहित करून ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

खासगी विहिरींच्या माध्यमातून ग्रामस्थांना पाणी उपलब्ध करून देण्यात आले असले तरी जनावरांसाठी मात्र, पाण्याची सोय नसल्याने पशुपालक त्रस्त झालेले आहेत. शहरासह ग्रामीण भागातील अनेक हातपंप बंद आहेत. नादुरस्त हातपंपांची दुरुस्ती केल्यास पाण्याची समस्या काही प्रमाणात दूर होऊ शकते.

एरंडोल शहरातील काही हातपंपांचा वापर खासगी व्यक्तींकडून कायमस्वरूपी स्वत:करता करण्यात येत आहे. नगरपालिकेने शहरात असलेल्या हातपंपांची पाहणी करून किती हातपंप सुरु आहेत, किती हातपंप बंद आहेत, किती हातपंपांचा खासगी कामासाठी वापर केला जातो, याची तपासणी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

आडगाव, तळई, पिंपळकोठा बुद्रुक यांसारख्या तालुक्यातील मोठ्या गावांना दरवर्षी पाण्याची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे शासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करून ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी मागणी महिला वर्गातून केली जात आहे. शहरासह दहा गावांना अंजनी प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यात येतो.

मात्र, सध्यास्थितीत अंजनी प्रकल्पातील जिवंत जलसाठा जवळपास संपुष्टात आला असून, शहरात गाळयुक्त व दुर्गंधीयुक्त पिवळसर रंगाचा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. शहरात सहा दिवसाआड, तर नवीन वसाहतींमध्ये आठ ते दहा दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे महिला हवालदिल झालेल्या आहेत. (latest marathi news)

गाळमुक्त अभियान राबविण्याची गरज

पावसाळा लांबल्यास शहरातदेखील पाण्याची गंभीर समस्या निर्माण होण्याची भीती आहे. अंजनी प्रकल्पात असलेल्या अत्यल्प जलसाठ्याचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे. अंजनी प्रकल्पातील जलसाठा कमी झाल्यामुळे शासनाने गाळमुक्त अभियान राबवून प्रकल्पातील गाळ उपसण्याची गरज आहे. शेतकरी व वीटभट्टीमालक दररोज प्रकाल्पातून गाळाचा उपसा करीत आहेत. प्रकल्प गाळमुक्त केल्यास भविष्यात प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ होणार आहे.

शुद्ध पाणी उपलब्ध होऊ शकते

एरंडोल शहरासाठी सुमारे पाच वर्षांपूर्वी आठ कोटी रुपयांची लमांजन बंधाऱ्यावरील तातडीची पाणीपुरवठा योजना मंजूर करून कार्यान्वित करण्यात आलेली होती. सध्यास्थितीत गिरणा धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले असून, लमांजन बंधारा पूर्ण क्षमतेने भरला आहे. एरंडोल नगरपालिकेने शहरासाठी लमांजन बांधाऱ्यातून पाणीपुरवठा केल्यास नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT