Water Shortage esakal
जळगाव

Jalgaon Water Shortage : धरणांतील साठ्यात घट, पाऊस लांबल्याचा परिणाम! 5 मध्यम प्रकल्पांत ठणठणाट

Jalgaon News : पावसाअभावी शेतकऱ्यांच्या पेरण्या एकीकडे खोळंबल्या आहेत, तर दुसरीकडे पाणीटंचाईचे संकट आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Water Shortage : जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस झालेला नाही. यामुळे पाणीटंचाईचे भिषण संकट ‘आ-वासून उभे आहे. जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या हतनूर धरणात ३२, तर गिरणा धरणात केवळ १२ टक्के साठा आहे. इतर पाच मध्यम प्रकल्पांत पाण्याचा ठणठणाट आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांच्या पेरण्या एकीकडे खोळंबल्या आहेत, तर दुसरीकडे पाणीटंचाईचे संकट आहे. जिल्ह्यातील धरणांत केवळ एकूण २४.६० टक्के जलसाठा आहे. (Jalgaon Decline in storage in dams)

जूनचा पंधरवडा उलटला, तरी अद्याप समाधानकारक पाऊस नाही. काही तालुके वगळता इतर तालुक्यांत १०० मिलिमीटर पाऊस झालेला नाही. मागील वर्षी ‘अल निनो’च्या प्रभावामुळे पाऊस जूनच्या शेवटी आला होता. यंदा तसा प्रभाव नाही. हवामान विभागाने चांगल्या पावसाचा अंदाजही वर्तविला. मात्र, मान्सून महाराष्ट्रात सक्रिय न झाल्याने कृषी क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे. लवकर मान्सून सक्रिय व्हावा, यासाठी विविध मंदिरात प्रार्थना करून ‘पर्जन्यसुक्ता’चे वाचन केले जात आहे.

जिल्ह्यातील ९४ गावांत पाणीटंचाई आहे. त्या गावांत ११३ टँकर सुरू आहेत, तर १६६ गावांत १८६ विहिरी अधिग्रहण केल्या आहेत. जूनमध्ये पावसाळा सुरू होईल, या आशेवर जिल्हा प्रशासनाने जून अखेरपर्यंतचा टंचाई आराखडा मंजूर केला आहे. त्यानुसार पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजनाही सुरू आहेत. मात्र, पावसाळा लांबला तर जिल्हा प्रशासनाची पाणीपुरवठ्याबाबत अडचण होऊ शकते

मागील वर्षी ‘अल निनो’चा इफेक्ट होता. त्यामुळे ९३ टक्के पाऊस झाला होता. त्याचा दुष्परिणाम पाणीटंचाईत झाला. मार्चपासूनच टँकरची संख्या वाढू लागली होती. यंदा तापमानाने ४७ अंशापर्यंत मजल गाठली होती. यामुळे जमिनीतील पाण्याची पातळीही दोन ते सव्वादोन मीटरने खालावली आहे. जमिनीतील पाणीपातळी वाढविण्यासाठी नागरिकांनी आतापासून पावसाचे पाणी जमिनीत जिरविण्यासाठी घराभोवत, मोकळ्या जागांमध्ये शोषखड्डे, जलपुनर्भरणाच्या योजना राबविण्याची गरज आहे. (latest marathi news)

जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पातील साठा असा

धरणाचे नाव--जलसाठा टक्के

हतनूर--३२.१७

गिरणा--१२.१०

वाघूर--५५.२०

मध्यम प्रकल्प

गुळ--४५.४९

अग्नावती--०

हिवरा--०

भोकरबारी--०

बोरी--०

अंजनी--०

मन्याड--०

अभोरा--५८.८३

मंगरूळ--४०.६०

सुकी--६७.१७

मोर--६३.१७

बहुळा--१.८६

तोंडापूर--१७.३६

शेळगाव--२९.५९

"जिल्ह्यात हवामान विभागाच्या अंदाजानुसार काही दिवसांतच मान्सून जोर धरेल. सध्या सिंचन प्रकल्पात पाणीसाठा कमी असला, तरी लवकरच त्यात वाढ होईल. नागरिकांनी पावसाळ्यात झाडे लावावीत व पडणारे पाणी जमिनीत जिरवून जलपातळी वाढवावी."

- आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Thalapathy News: विजय थलपतींनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा!

Rajgad News : वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका; ढोल ताशांच्या गजरात राजगडच्या मावळ्यांचा जल्लोष

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

Thane News: काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश; पदाधिकाऱ्यांच्या पक्षत्यागावर संतोष केणेंचा माजी आमदारांवर थेट आरोप, म्हणाले...

Maharashtra Latest News Update: माटुंगा पोलिसांच्या थरारक कारवाईत दरोड्यातील मुख्य आरोपी अटक

SCROLL FOR NEXT