Bhole Sarkar Mitra Parivar inviting Guardian Minister Gulabrao Patil for Kavad Yatra. esakal
जळगाव

Jalgaon News : धरणगाव येथे यंदाही कावडयात्रेचे आयोजन; तापी नदीतून आणणार पाणी

Jalgaon : शहरातील भोले सरकार मित्र परिवारातर्फे दरवर्षाप्रमाणे यंदाही कावड यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरातील भोले सरकार मित्र परिवारातर्फे दरवर्षाप्रमाणे यंदाही कावड यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. येत्या १८ व १९ ऑगस्ट असे दोन दिवस या कावडयात्रोत्सवात शहरातील तरुण मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. दरम्यान, या कावडयात्रेचे आमंत्रण आयोजकांमार्फत ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना शुक्रवारी (ता.२) देण्यात आले. (Water will be brought from Tapi river to organize Kavad Yatra in Dharangaon this year too )

येथील सार्जेश्वर महादेव मंदिराचा भोले सरकार मित्र परिवाराच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही श्रावण महिन्यातील मानाची पवित्र महाकावड यात्रा निघणार आहे. येत्या १८ व १९ ऑगस्ट रोजी या कावडयात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. १८ ऑगस्टला संध्याकाळी तापीनदीचे पूजन व रात्री नऊला धरणगाव येथील इंदिरा गांधी महाविद्यालयापासून खासगी वाहनाने (ट्रक) सर्व भाविक तापी नदीवर कावड भरण्यासाठी रवाना होतील.

दुसऱ्या दिवशी (ता. १९) मध्यरात्री १२ वाजेला तापी नदीवरून कावड भरून सर्व भाविक निघतील व सकाळी सातला धरणगाव शहरात दाखल होतील. त्यानंतर हनुमाननगरातील माउली वारकरी शिक्षण संस्थेतून कावडयात्रेची शोभायात्रा निघेल. डेरू पथक, झांज पथक व वाजंत्रीसह डेलची चौक, वाणी गल्ली, धरणी चौक, कोट बाजार, परिहार चौक, बजरंग चौक, बालाजी पतसंस्थेसमोरून छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, बसस्थानकासमोरून येऊन कावडयात्रेची शोभायात्रा सार्जेश्वर महादेव मंदिराजवळ सकाळी ११ वाजता दाखल होईल व तेथे समारोप होईल. (latest marathi news)

दरम्यान, या कावडयात्रेचे निमंत्रण देण्यासाठी शुक्रवारी भोले सरकार मित्र परिवारातील सदस्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची पाळधी येथे जाऊन भेट घेतली. यावेळी सिद्धार्थ वाघरे, नीलेश चौधरी, राज चौधरी, राज पाटील, चेतन चौधरी, उल्केश धर्माधिकारी, धीरज पाटील, तुषार पाटील, बंटी चौधरी, मुकुल चौधरी, करण येवले, आकाश धनगर, बाळा मराठे, प्रथमेश चौधरी, पवन चौधरी आदी भाविक उपस्थित होते.

पालकमंत्र्यांकडून यात्रेला नटराज भगवान मूर्ती भेट

धरणगाव शहरात १८ व १९ ऑगस्टला निघणाऱ्या कावड यात्रेसाठी धरणगाव भोले सरकार मित्र परिवाराराकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना शुक्रवारी (ता.२) सकाळी निमंत्रण देण्यात आले. यावेळी पालकमंत्री पाटील यांच्याकडून कावड यात्रेसाठी नटराज भगवान यांची मूर्ती भेट देण्याचे जाहीर करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT