Wedding Culture esakal
जळगाव

Wedding Culture: लग्नाची रित न्यारी, प्रथा, परंपराच बदलली सारी! आधुनिक बदलाचा परिणाम; आता श्लोकही गेले अन्‌ गेली तुपाची धार!

Jalgaon News : श्लोकाला तश्याच पद्धत्तीच्या श्लोकाने उत्तर दिले जात असे. 'कोणी एक विचित्र पुतळा जेवावया बैसला.... असाही एक श्लोक असे. मात्र, शेवटी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’, असे देवाचे नामस्मरण असे. आता ते काळाच्या पडद्याआड गेले.

ॲड. बाळकृष्ण पाटील

गणपूर (ता. चोपडा) : साधारणपणे चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी सुरू असलेल्या लग्नातील परंपरा काळानुरूप बदलत गेल्या. आता तर लग्न वेगळ्याच पद्धतीवर येऊन ठेपले. पंगतीत प्रत्येकाला लावला जाणारा लाल गंधाचा टिळा आणि श्लोक म्हणून जेवायला होणारी सुरुवात याची अपेक्षा ती आता काय करणार! या श्लोकांची गंमतच न्यारी होती, त्यातून जुगलबंदीही रंगे.

श्लोकाला तश्याच पद्धत्तीच्या श्लोकाने उत्तर दिले जात असे. 'कोणी एक विचित्र पुतळा जेवावया बैसला.... असाही एक श्लोक असे. मात्र, शेवटी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’, असे देवाचे नामस्मरण असे. आता ते काळाच्या पडद्याआड गेले. (Jalgaon Wedding rituals customs traditions changed)

साधारणपणे दोन हजारच्या दशकापर्यंत लग्न लागल्यावर जेवणाच्या पंगती बसायाच्या, त्या पंक्तीत नवरदेव बसल्याशिवाय पंगतीला सुरुवात होत नसे. शिवाय या पंक्तीत बसलेल्या सर्वांना लाल गंधाचा टिळा लावत असे आणि शेवटी तुपाची धार फिरल्यावर ज्येष्ठ मंडळी लोकांना जेवायला सुरुवात करावी, अशी विनंती करीत किंवा फर्मान सोडत.

काळ बदलला तशा प्रथा, परंपराही बदलत गेल्या. आता लग्नाअगोदरच पंगतींना सुरुवात होते आणि जेवण करून बरेच वऱ्हाडी, नातेवाईक टाटा, बायबाय करीत निघूणही जातात. शेवंतीतल्या नवरदेवाचा घोडा व नाचणारी त्याची दोस्त मंडळी याशिवाय शेवंतीतही कोणी दिसत नाही. पंगतीत गंधाचा टिळा लावणे तर कधीच बंद झाले. ती श्लोक म्हणणारी पिढी आता शेवटची घटका मोजत आहे.

त्यामुळे श्लोक व भोजनाचा काही संबंध आहे, हीच बाब आता दुर्लक्षित होऊ लागली आहे. अलीकडच्या दशकात तर सहा तासांत दोन वेळा लग्न लावण्याची पद्धत सुरू होऊ लागली आहे. सर्व मंगलाष्टके म्हणून सकाळी वैदिक पद्धतीने लागणारे लग्न व दुपारी उशीर होत आहे. म्हणून पुरोहितांनाच उरकवा गुरुजी लवकर, असे सांगणाऱ्यांची संख्या वाढू लागल्याने लग्नातल्या बऱ्याच प्रथा, परंपरा मोडीत निघाल्यात जमा आहेत. (latest marathi news)

सर्वच पिढ्यांसाठी एक संकेत!

पूर्वीच्या काळातील लग्ने आता राहिली नाहीत, चार दिवसांची, तीन दिवसांची, दोन दिवसांची हळद राहत असे. लग्नाच्या आदल्या रात्री नवरीची घोड्यावरून मिरवणूक निघत असे. त्याला फुणके म्हणत असत. बरीच लग्नं गोरज मुहूर्तावर लागत असत. साधारणपणे १९८५ ते १९९०पर्यंत अशी गोरज मुहूर्ताची लग्ने होत असत.

हल्लीही तशी काही लग्न होतात. मात्र, दुपारी होणारी लग्न आता जास्त होऊ लागली आहेत. लग्नानंतर रात्री बिद फिरविण्याची प्रथा होती. आता ती बंद झाल्याने हे सर्व होत असताना जुन्या प्रथा व परंपरा आपण कधी मागे टाकून आलो, हे कळलेसुद्धा नाही.

नवीन प्रथा व परंपरा सुरू होत असल्या तरी जुन्या प्रथा परंपरांशी त्यांची तुलना करता त्या योग्य की, अयोग्य, हे ठरवणे संशोधनाचा भाग ठरेल. परंतु, एका धाग्याची किंमत अन्‌ लग्न परंपरा ही येणाऱ्या सर्वच पिढ्यांना एक संकेत देत राहतील, हे मात्र नक्की!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Dombivli Election : आमदारांच्या मुलाचा बिनविरोध विजय; कल्याण-डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाची घोडदौड वेगात!

Sudhakar Badgujar : नाशिक भाजपमध्ये बडगुजर पॅटर्नचा धमाका; पत्नी आणि पुत्रासह स्वतःची उमेदवारी केली निश्चित

Latest Marathi News Live Update : एरंडोल नगरपालिका निवडणुकीत पाच अविवाहित युवकांचा विजय

BEE Star Rating : इलेक्ट्रॉनिक वस्तु खरेदीचे नियम बदलले; लागू झाला BEE स्टार रेटिंगचा आदेश, थेट तुमच्या खिशावर होईल परिणाम

Khus Khus Halwa: गाजर किंवा मूगडाळीचा हलवा विसरा! या हिवाळ्यात ट्राय करा पौष्टिक आणि चविष्ट ‘खसखस हलवा’

SCROLL FOR NEXT