Cotton crop sprayed with herbicide esakal
जळगाव

Jalgaon Rain Crisis: ओल्या दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पंधरवड्यात सूर्यदर्शनच नाही; पिकांत तण वाढल्याने शेतकऱ्यांची कोंडी

Heavy Rain Crop Damage : तसा पाऊस होईलही, अशी शाश्वती आता येऊ लागली आहे. मात्र, पाऊस धो-धो पडून थांबला, असे या पावसाळ्यात दिसून आले नाही.

ॲड. बाळकृष्ण पाटील

गणपूर (ता. चोपडा) : या वर्षाचा पावसाळा खूप होतोय असा नाही. मात्र, पावसाची दररोज हजेरी लागत असल्याने गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून सूर्यदर्शन होऊ न शकल्याने पिकांची स्थिती नाजूक झाली आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती ओल्या दुष्काळाच्या उंबरठ्यावर असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (wet drought Dilemma of farmers due to growth of weeds in crops)

रोजच्या पावसाने निंदणी, कोळपणी, डवरणी थांबल्याने पीके तणात डुंबली आहेत. या यावर्षी शंभर ते १०५ टक्के पावसाळा होईल, असा अंदाज सुरुवातीला सर्वांनीच वर्तवला होता. तसा पाऊस होईलही, अशी शाश्वती आता येऊ लागली आहे. मात्र, पाऊस धो-धो पडून थांबला, असे या पावसाळ्यात दिसून आले नाही.

दररोज पावसाची हजेरी लागत असल्याने साधारणपणे खानदेशात सर्वत्र पाचशे मिलिमीटरच्या जवळपास पावसाची हजेरी लागली आहे. सलग पंधरा-वीस पंचवीस दिवस पाऊस सुरू असल्याने कामे खोळंबलीत. निंदणी थांबली, कोळपणी, डवरणी बंद पडली, खते देण्याची अडचण आली.

त्यामुळे पिकांची वाढ होण्याची गती थांबली. काही भागांत पिके पिवळसर पडली आहेत, तर काही भागांत तणांमध्ये बुडाली आहेत. विशेषतः बागायती तालुक्यांत तणांचे प्रमाण जास्त दिसून येत असल्याने भरपूर मजूर लावूनही तणे आवरली गेली नाहीत. यावर्षी खानदेशात आतापर्यंत किमान एक कोटी रुपयांच्या तणनाशकाची विक्री झाल्याचा अंदाज आहे. (latest marathi news)

एवढे तणनाशक बहुदा यापूर्वी वापरले गेले नसावे. शेतकऱ्यांच्या हातात दररोजचा पाऊस पडत असल्याने काहीच राहिले नसल्याने आहे, ते तण जागीच थांबवणे हा एकच पर्याय उरल्याने दररोज तणनाशकाची खरेदी करून फवारणी करणारे शेतकरी दिसून आले. बऱ्याच शिवारात आजही ७५ दिवसांच्या कापसाला कीडनाशकाची पहिली फवारणीही झाली नसल्याची अनेक उदाहरणे आहेत, तर कांद्याचे बियाणे घेऊन वाफसा नसल्याने एक तर घरात पडून आहे. नाहीतर शेतात टाकून सडले आहे.

खरिपाबाबतच्या उत्पादनाची शंका!

सततच्या पावसाने फुलपात्यांची गळ सुरुवातीला झाल्याने उत्पादनाबाबत शंका येऊ लागली आहे. बागायती असलेल्या बऱ्याच भागांत पिकांमधील निंदणी करणे कठीण झाल्याने बऱ्याच शेतकऱ्यांना उभे असलेले पीक तणांसह ओखरटी करावे लागणार आहे. पावसाळा चांगला असला तरीसुद्धा खरिपाबाबतच्या उत्पादनाची शंका येऊ लागली आहे.

दररोजचा पाऊस आता शेतकऱ्याचे मनोबल खचवणारा व मजुरांनाही हात चोळायला लावणारा असा ठरला आहे. येत्या दोन-चार दिवसांत सूर्यदर्शन होईल, अशी अपेक्षा घेऊन शेतकरी आज कामाला लागले असून, यंदाचा खरीप ओल्या दुष्काळाच्या उंबरठ्यावर आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT