Cotton  sakal
जळगाव

जळगाव : पांढऱ्या सोन्याचे भाव गडगडले

कपाशीचे दर सात ते साडेसात हजार रुपयांनी खाली

सकाळ वृत्तसेवा

जळगाव (जामनेर) : महिनाभरापूर्वी कपाशीचा भाव प्रतिक्विंटलला यंदा नऊ हजार रुपयांवर गेला होता. आता शेतकऱ्यांकडून जसजसा माल विक्रीसाठी बाजारात यायला सुरवात झाली, तसतसा कपाशीचा भाव व्यापाऱ्यांच्या नफेखोरीच्या लालसेपोटी हजार, बाराशे रुपयांनी गडगडला. साडेआठ हजार ते नऊ हजार रुपये प्रतिक्विंटल जाणाऱ्या पांढऱ्या सोन्याचे (कपाशी) भाव सध्या साडेसात ते सात हजार ८०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत.

शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका

यंदा पावसाचे आगमन चांगले झाले. मात्र पिके फुले-पातीवर येत असतानाच चक्रीवादळासह तालुक्यात काही ठिकाणी अतिवृष्टीही झाली. त्यात अनेकांच्या शेतात पाणी घुसून पिके वाया गेली, तर काहींची मक्याची कणसे भरत असताना पावसाचा मार बसला. त्यामुळे नगदी पीक असलेल्या कपाशीच्या कैऱ्या-बोंडे अतिवृष्टीने निखळल्या. शिवाय वेचण्यासाठी तयार असणारी कपाशी झाडावरच लाल-पिवळी पडली. परिणामी यंदाच्या कपाशी उत्पन्नात मोठी घट दिसून येत आहे. एकीकडे सुरवातीला चांगला दिसणारा हंगाम पावसाच्या लहरीपणामुळे निम्म्यावर आला, तर दुसरीकडे कधी नव्हे एवढा क्विंटलमागे नऊ हजार रुपयांच्या भावाने शेतकरी समाधानी दिसत असतानाच तो भाव चक्क हजार- बाराशे कमी झाला. गेल्या वर्षीच्या वेचणीच्या मजुरीतही यंदा चार ते पाच रुपयांची वाढ झाली.

आधी सात ते आठ रुपये प्रतिकिलो आता मात्र दहा ते बारा रुपयांपर्यंत कपाशी वेचणीसाठी मोजावे लागतात. आंतरराष्ट्रीय बाजारात कपाशीला चांगला भाव मिळत असल्याने येथेही तब्बल ९००० हजार रुपये प्रतिक्विंटल गेला होता. मात्र व्यापाऱ्यांच्या नफेखोरीमुळे महिन्यातच हजार-बाराशेने कमी झाला, तर यंदा वीज, खते आणि मजुरीत वाढ झाल्याने हातात काहीच उरेनासे झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Ganesh Visarjan Live: गणपती विसर्जनासाठी पुण्यात कडेकोट बंदोबस्त; आठ ते दहा हजार पोलिसांचा ताफा तैनात

Ratnagiri: आजीचा मोबाईल घेऊन शाळेत गेली, पालक ओरडताच आठवीतील विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल

What a Catch! मार्को यान्सेनने दोन बोटावर घेतलेल्या झेलची हवा! फलंदाजासह सारेच स्तब्ध; तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी, Video

Chha.Sambhaji Nagar: एएस क्लब उड्डाणपुलावरून तरुणीने घेतली उडी

Mayuresh Prabhune : पाऊस पडतोय तरी दुष्काळ का? महाराष्ट्रातील दुष्काळाचं खरं कारण काय?

SCROLL FOR NEXT