Oxygen Park esakal
जळगाव

Jalgaon News : गांधलीत 2 एकरावर विप्रो ऑक्सिजन पार्क; मियावाकी' पद्धतीने 10 हजार वृक्षांची लागवड

Jalgaon News : गांधली ग्रामपंचायतीच्या संयुक्त प्रयत्नातून विप्रो ऑक्सिजन पार्क प्रकल्पांतर्गत मियावाकी पद्धतीने स्थानिक प्रजातीची दहा हजारावर झाडे जगविली आहेत.

सकाळ वृत्तसेवा

गणपूर : गांधली (ता.अमळनेर) येथे विप्रो कन्झुमर केअर अमळनेर,आधार संस्था व गांधली ग्रामपंचायतीच्या संयुक्त प्रयत्नातून विप्रो ऑक्सिजन पार्क प्रकल्पांतर्गत मियावाकी पद्धतीने स्थानिक प्रजातीची दहा हजारावर झाडे जगविली आहेत. गावाशेजारी दोन एकर क्षेत्रात आठ प्लॉट करून प्रत्येक प्लॉट मध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडे जगविली असून खानदेशातील अशा प्रकारचा हा पहिला प्रकल्प आहे. (Jalgaon Wipro Oxygen Park on 2 acres in Gandhli)

त्यात जांभूळ,मोहगणी,करंज अर्जुन ,शिसव,कांचन, आवळा, बदाम, बेल, चिंच, पापडी, कडुनिंब, भोकर, चिंचोल, पिंपळ आदी प्रकारची झाडे आहेत.तर एका प्लॉटमध्ये सर्व प्रकारची फुलझाडे लावण्यात आली आहेत.

प्रति व्यक्ती १० वृक्ष

गावठाण जमीन सामाजिक वनीकरण ला वृक्ष लागवडीसाठी देऊन त्यात १८ हजार ऑक्सिजन पार्क मधील १० हजार याप्रमाणे २८ हजार झाडे जगवण्याचा हा संकल्प गावातील लोकसंख्या ३ हजार असून एक व्यक्ती दहा झाडे असा ग्रामपंचायतीचा प्रयत्न असल्याचे सरपंच नरेंद्र शिवाजीराव पाटील यांनी सांगितले.

मूळ जपान मधील या संकल्पनेत अतिशय कमी जागेत दाट पध्दतीच्या जंगलातून वातावरणात आॅक्सीजन वाढविण्याचा प्रकल्पात सघन पद्धतीने झाडे लावून जगविली असून आधार संस्थेच्या अध्यक्षा भारतीताई पाटील, रेणू प्रसाद, विप्रोचे सुधीर बडगुजर यांनी हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शन केले.

वृक्ष आता पाच फुटापर्यंत वाढली असून चारही बाजूने कुंपण करण्यात आले आहे. शंभर टक्के झाडे जगवून तयार झालेला हा खानदेशातील अशा पद्धतीचा हा लँडमार्क प्रोजेक्ट ठरला आहे. दोन एकर क्षेत्रात तारांचे कुंपण करून, शाश्वत पाण्याची व्यवस्था केली असून पुढील पाच वर्षाचे व्यवस्थापन, लागणारे मनुष्यबळ व खर्च (कुंपणासहीत) विप्रो कंपनी अमळनेर करणार आहे.

तसेच तांत्रिक सल्ला व मार्गदर्शन आधार संस्था आणि स्थानिक व्यवस्थापन व संरक्षण ग्रामस्थ गांधली व ग्रामपंचायत करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. किशोर पाटील, शामकांत पाटील,रामकृष्ण महाजन, नितीन चव्हाण.

गिरीश पाटील चेतन थोरात ,हेमंत पाटील ,सरपंच, उपसरपंच,सदस्य ग्रामसेवक प्रमोद पाटील, प्रवीण पाटील,संजय पाटील,बचत गटाच्या सदस्या,गावातील पाणी फाऊंडेशन संस्थेचे कार्यकर्ते आदीचे प्रकल्पासाठी सहकार्य झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईला जागतिक दर्जाचे टनेल मत्स्यालय मिळणार! कुठे अन् कधी पूर्ण होणार? बीएमसीने संपूर्ण योजना सांगितली

Elon Musk X Chat Messaging App : इलॉन मस्कने लाँच केलं X Chat! ; आता ‘WhatsApp’ अन् ‘Arattai’ला जबरदस्त टक्कर

School Trip Rules: शिक्षकांसह विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! शैक्षणिक सहलीसाठी नवे नियम लागू

CNG Supply: मुंबईतील सीएनजी पुरवठा कधी सुरळीत होणार? एमजीएलने तारीख अन् वेळच सांगितली, वाहनचालकांना मोठा दिलासा

Numerology Predictions : 'या' तारखेला जन्मलेले लोक असतात जास्त निरोगी..वयाची साठी पार केली तर जडत नाहीत आजार

SCROLL FOR NEXT