Accidental car. esakal
जळगाव

Jalgaon Accident News : धरणगाव येथे वाहन उलटून महिला ठार! 7 मजूर जखमी

Jalgaon News : शहरालगत असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ शेतमजूर महिलांना शेतात घेऊन जाणाऱ्या वाहन उलटून एक महिला जागीच ठार झाली तर सात जखमी झाल्या.

सकाळ वृत्तसेवा

धरणगाव : शहरालगत असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ शेतमजूर महिलांना शेतात घेऊन जाणाऱ्या वाहन उलटून एक महिला जागीच ठार झाली तर सात जखमी झाल्या. ही घटना मंगळवारी (ता. ३०) सकाळी घडली. अपघातानंतर चालक पसार झाल्याचे समजते. येथील हनुमान नगरमधील काही मजूर महिलांना शेतकामासाठी सकाळी साडेआठच्या सुमारास झायलो कारने (क्रमांक एमएच १९, एपी ९९९१) मधून शेतात नेण्यात येत होते. (Jalgaon Accident News)

शेतात जाताना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढे रस्त्याच्या कडेला कार अचानक उपलटी. या अपघातात कारमधील बसलेले सर्व जण कमी अधिक प्रमाणात जखमी झाले आहेत. दरम्यान, धरणगाव वैद्यकीय रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार चंद्रकलाबाई महाजन यांचा मृत्यू झाला आहे.

उषाबाई गुलाब महाजन (वय ३५), नीताबाई अशोक महाजन (वय ४०), स्वाती शिवाजी वाघ (वय ३४), जिजाबाई लक्ष्मण महाजन (वय ६०), माधुरी दीपक महाजन (वय ३८). (latest marathi news)

सुमन महाजन, ढगूबाई महाजन, महेंद्र पाटील हे जखमी झाले आहेत. या बाबत धरणगाव पोलिसात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी चंद्रकांत पाटील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT