Construction of rooms continuing up to slab level. esakal
जळगाव

Jalgaon News: जिल्ह्यात 179 शाळा खोल्यांचे काम पूर्णत्वाकडे! जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 21 कोटी 74 लाख 75 हजार मंजूर

Jalgaon News : साधारणपणे एका खोलीसाठी अदमासे १२ लाख रुपये खर्च करण्यात येत असून, या सर्व खोल्यांच्या कामांसाठी २१ कोटी ७४ लाख ७५ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.

सकाळ वृत्तसेवा

गणपूर (ता. चोपडा) : जळगाव जिल्हा परिषदेंतर्गत मंजुरी मिळालेल्या एकूण १७९ शाळा खोल्यांचे काम विविध तालुक्यांतील शाळांच्या आवारात सुरू आहे. साधारणपणे एका खोलीसाठी अदमासे १२ लाख रुपये खर्च करण्यात येत असून, या सर्व खोल्यांच्या कामांसाठी २१ कोटी ७४ लाख ७५ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. (Jalgaon work of 179 school rooms in district)

जिल्हा परिषदेंतर्गत सुरू असलेल्या शाळा खोल्यांची कामे काही ठिकाणी स्लॅब लेव्हलपर्यंत आली असून, काही खोल्यांचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. काही ठिकाणी अगोदर बांधलेल्या खोल्यांचे निर्लेखन करण्यात आले. त्यानंतर त्या खोल्या पाडून त्या जागेवर नवीन खोल्या बांधण्याचे काम सुरू असून, काही ठिकाणी नव्या जागेवर हे काम सुरू करण्यात आले आहे.

मंजूर रकमेतून अमळनेर तालुक्यातील सात गावांच्या शाळांच्या प्रांगणात, भडगाव तालुक्यातील १६ गावांमध्ये, बोदवड तालुक्यात चार, धरणगाव तालुक्यात दहा, पारोळा तालुक्यात १६, जळगाव तालुक्यात २०, यावल तालुक्यात ११, रावेर तालुक्यात दोन, चाळीसगाव तालुक्यात २६, चोपडा तालुक्यात २०, जामनेर तालुक्यात २४, मुक्ताईनगर तालुक्यात ९, एरंडोल तालुक्यात दोन, तर पाचोरा तालुक्यात ११, अशा एकूण १७९ खोल्यांचे काम सध्या प्रगतिपथावर असून, या खोल्या पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना बसण्यासाठी वापरण्यातयेतील. (latest marathi news)

या कामांमध्ये दहा वर्ष गळती प्रतिबंधक कार्यवाही व देखभाल दुरुस्तीचा समावेश आहे. ही कामे काही महिन्यांत पूर्ण होतील, अशी अपेक्षा आहे. जिल्ह्यातील काही शाळांमधील खोल्या पडक्या झाल्या होत्या, तर काही ठिकाणी वर्गखोल्या कमी पडत असल्याने ही तरतूद करण्यात आली आहे. या खोल्या पूर्ण झाल्यावर प्राथमिक शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी नव्या खोल्यांमध्ये शिक्षण घेऊ शकतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर काय होती राज ठाकरेंची प्रतिक्रिया? अमित ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करत सगळंच सांगितलं...

Pune Youth Murder in College Campus : पुण्यात खळबळ!, सिंहगड कॉलेज परिसरात भरदिवसा तरूणाची कोयत्याने वार करून हत्या

Sheikh Hasina: शेख हसीना यांना फाशीची शिक्षा; भारत आता त्यांना परत बांगलादेशात पाठवणार का? जाणून घ्या नियम...

Latest Marathi Breaking News:आदित्य ठाकरेंनी ट्विट करत केलं अमित ठाकरेंचं समर्थन

Kolhapur News: गोकुळच्या लिंगनूर कार्यक्रमात ‘लाडकी बहीण’ वरुन रंगले कलगीतुरे

SCROLL FOR NEXT