Death News esakal
जळगाव

Jalgaon News : हळदीच्या कार्यक्रमात नाचताना जळगाव येथील तरुणाचा मृत्यू; हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मंडपातच कोसळला

Jalgaon News : मयूर हा नातेवाइकाच्या विवाहानिमित्त बुधवारी चोपडा शहरातील श्रीरामनगरात आला होता. त्या ठिकाणी हळदीच्या कार्यक्रमात मयूर नाचत असताना अचानक त्याच्या छातीत दुखू लागल्याने तो खाली कोसळला.

सकाळ वृत्तसेवा

चोपडा : शहरातील श्रीरामनगर भागात नातेवाइकाच्या लग्नसोहळ्यात हळदीच्या कार्यक्रमात वाजंत्रीच्या तालावर नाचणाऱ्या तरुणाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. जळगावच्या मेहरूणमधील रामेश्वर कॉलनीतील राहिवासी असलेल्या या तरुणाचे नाव मयूर राजेंद्र शिंदे (वय ३१) असे आहे. ही घटना बुधवारी (ता. १०) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. (Jalgaon youth dies while dancing at Haldi event)

मयूर हा नातेवाइकाच्या विवाहानिमित्त बुधवारी चोपडा शहरातील श्रीरामनगरात आला होता. त्या ठिकाणी हळदीच्या कार्यक्रमात मयूर नाचत असताना अचानक त्याच्या छातीत दुखू लागल्याने तो खाली कोसळला. त्यानंतर जागीच त्याचा मृत्यू झाला. नातेवाइकांनी तातडीने चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात त्याला दाखल केले.

मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर पाटील यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. डॉ. पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून चोपडा शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. हवालदार शेषराव तोरे तपास करीत आहेत. मयूरच्या मागे पत्नी, आई-वडील, बहीण, भाऊ, मुले असा परिवार आहे. दरम्यान, आनंदमय वातावरण असलेल्या लग्नसोहळ्यात नाचणाऱ्या मयूरच्या दुर्दैवी झालेल्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT