A car hit a tree. esakal
जळगाव

Jalgaon Accident News : कारचे नियंत्रण सुटल्याने झाडावर आदळली; कासमवाडीतील तरुण ठार

Jalgaon Accident : शिरसोली रोडवरील हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेल्या कासमवाडीतील तरुण अपघातात ठार झाला, तर त्याचे तीन मित्र गंभीर जखमी झाले.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Accident News : शिरसोली रोडवरील हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेल्या कासमवाडीतील तरुण अपघातात ठार झाला, तर त्याचे तीन मित्र गंभीर जखमी झाले. कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. आनंदा शांताराम सोनवणे असे मृत तरुणाचे नाव आहे. कासमवाडीतील आनंदा शांताराम सोनवणे (वय ३९), त्याचे भैरव भगवान राणे, पप्पू आढाव, योगेश रेंभोटकर रविवारी (ता. १४) शिरसोली गावाजवळील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी कारने गेले होते. (youth from Kasamwadi was dead when his car went out of control )

जेवणानंतर कारने (एमएच १९, सीझेड १२१२) शिरसोली रोडवरून शहरात येत असताना, दुपारी चारच्या सुमारास गुलाबराव देवकर अभियांत्रिकी महाविद्यालयापुढे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने सुसाट कार रस्त्याच्याकडेला कडूलिंबाच्या झाडावर आदळली. अपघातात आनंदा सोनवणे जागीच ठार झाला, तर कारमधील भैरव राणे, पप्पू आढाव, योगेश रेंभोटकर गंभीर जखमी झाले. वाहनधारक आणि ग्रामस्थांनी चौघांना अपघातग्रस्त कारमधून बाहेर काढून खासगी वाहनातनू जिल्‍हा रुग्णालयात रवाना केले. अपघाताची माहिती कळताच जिल्हा रुग्णालयात मित्रपरिवार व नातेवाइकांनी गर्दी केली होती.

...तर वाचला असता जीव

कारने कडूलिंबाच्या झाडाला धडक दिल्यावर बोनट आणि चेसीस चक्काचूर झाली. डॅशबोर्डपर्यंत झाडाचा बुंधा पोचला आहे. यावरून कारच्या वेगाचा अंदाज येतो. चालकासह कारमधील मित्रांनी सीटबेल्ट लावला असता, तर कदाचित कारच्या डॅशबोर्डसह इतर ठिकाणाहून एअरबॅग्ज्‌ उघडून जखमींना कमी दुखापत झाली असती. कदाचित चालकाचा जीवही वाचला असता, असे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Pune Kondhwa Rape Case : पुणे 'कुरियर बॉय' बलात्कार प्रकरण; आरोपीस अटक अन् धक्कादायक माहितीही उघड!

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

Ulhasnagar Crime : दारू पार्टीतील किरकोळ वादातून मित्राकडून मित्राचा खून; आरोपी शकील शेखला बेड्या

SCROLL FOR NEXT