ZP School esakal
जळगाव

Jalgaon ZP School : जिल्हा परिषद शाळेत पुस्तके दाखल; पहिल्याच दिवशी मिळणार मोफत पुस्तके

Jalgaon ZP : इयत्ता पहिली ते आठवीच्या जिल्ह्यातील ३ लाख ९६ हजार ३५९ विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon ZP School : नवे शैक्षणिक वर्ष येत्या शनिवार (ता. १५)पासून सुरू होत आहे. जिल्हा परिषदेच्या समग्र शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या जिल्ह्यातील ३ लाख ९६ हजार ३५९ विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. दोन आठवड्यांपूर्वीच प्रत्येक तालुक्यावर शंभर टक्के पुस्तकांचे संच दाखल झाले. जिल्ह्यातील प्रत्येक शाळा स्तरावर ९० टक्के पुस्तकांचा साठा दाखल झाला आहे. (Zilla Parishad School will get free books on first day )

येत्या दोन दिवसांत शाळा स्तरावर पुस्तकांचा संच पोहोचणार आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी पुस्तके विद्यार्थ्यांच्या हाती पडणार आहेत. बालभारती पोर्टकडून नाशिक पाठ्यपुस्तक भांडार विभाग आणि वितरण विभागाकडे पुस्तके आली आहेत. दोन आठवड्यांपूर्वीच जिल्ह्यातील प्रत्येक तालुकास्तरावर शंभर टक्के पुस्तके पोचली. शाळास्तरवर पुस्तके पोचण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

१५ जूनलाच इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्याचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे. जिल्हा परिषदेच्या समग्र शिक्षा अभियानांतर्गत मराठी, हिंदी, उर्दू आणि इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप होईल. (latest marathi news)

दोन दिवसात शंभर टक्के

जिल्ह्यातील १५ तालुक्यांत शिक्षण विभागाने १६ लाख ४७ हजार ३६८ पुस्तकांची मागणी केल्यानुसार १५ लाख ९२ हजार ६११ पाठ्यपुस्तकांचा संच दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या दोन दिवसांतच शाळास्तरावर पाठ्यपुस्तकांचे संच शंभर टक्के दाखल होणार आहेत.

सात तालुक्यात शंभर टक्के पुस्तके दाखल

नाशिक पाठ्यपुस्तक भांडार विभागाकडून दोन आठवड्यांपूर्वीच तालुकास्तरावर पुस्तके दाखल होण्याची प्रक्रिया सुरु झाली होती. आता शाळास्तरावरही ९० टक्के पुस्तकांचे संच दाखल झाले आहेत. यात अमळनेर, चोपडा, धरणगाव, एरंडोल, मुक्ताईनगर, पाचोरा, पारोळा या सात तालुक्यांतील शाळांमध्ये शंभर टक्के पुस्तकांचा साठा उपलब्ध झाला असून, शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके पडणार आहेत.

''शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके देण्याचे नियोजन सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येतील.''-विकास पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Dhabi Visa: भारतीय पर्यटकांसाठी खुशखबर! अबू धाबीचा UAE व्हिसा मोफत मिळणार, अटी काय अन् कुणाला फायदा होणार?

India Unemployment Rate: तरुणांसाठी नोकरीची चिंता कायम! देशातील बेरोजगारीची स्थिती ‘जैसे थे’; दर ५.५ टक्क्यांवर स्थिर

विद्यार्थ्यांनो, तुमच्या हातात बदलाची ताकद! गावाची समस्या जगासमोर मांडा; साम टीव्ही देतंय ‘Next Gen Reporter’चं व्यासपीठ

Pune Grand Tour : पुणे ग्रँड टूरसाठी ४१३ किमीचे नवीन रस्ते; ६२७ कोटींचा खर्च

Nutritious Diet : पोषण आहाराअभावी विद्यार्थ्यांची ताटे रिकामीच! कुठे तेल आहे तर तांदूळ नाही, हळद आहे तर जिरे-मोहरी नाही

SCROLL FOR NEXT