Zilla Parishad Marathi Children's School students studying in class I and II in the same class.  esakal
जळगाव

Jalgaon: पहूर कसबेची ZP शाळा मृत्यूशय्येवर! इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत अवघे 23 विद्यार्थी; सहावी, सातवीचे वर्ग पडले पूर्णपणे बंद

Jalgaon News : शाळेला जगविण्यासाठी संजीवनी देण्याचे कार्य शिक्षकद्वयी करीत असून, ग्रामस्थांनी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे.

शंकर भामेरे

पहूर (ता. जामनेर) : गोरगरीब लेकरांसाठी शिक्षणाचे हक्काचे व्यासपीठ आणि गावाचे 'शिक्षण वैभव' असणारी जामनेर तालुक्यातील पहूर कसबे जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा मृत्यूशय्येवर असून, शेवटच्या घटका मोजत आहे. या शाळेत पहिली ते पाचवीपर्यंत अवघे २३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेला जगविण्यासाठी संजीवनी देण्याचे कार्य शिक्षकद्वयी करीत असून, ग्रामस्थांनी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे. (Jalgaon ZP School of Pahoor Kasbe bad condition)

मराठी शाळा खऱ्या अर्थाने गोरगरीब हीन -दीन जनतेच्या लेकरांसाठी शिक्षणाची हक्काची केंद्र आहेत. बदलत्या धोरणांमुळे मराठी शाळांकडे पालकांचा ओढा कमी होत असून, परिणामी जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडू लागल्याचे भीषण चित्र निर्माण झाले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात इसवी सन १९३६ मध्ये जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा सुरू झाली.

पहूर कसबे गावाच्या प्रवेशद्वारापाशी गावाचे वैभव असणारी जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा आज पुरेशा पटसंख्येअभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहे. मृत्यूशय्येवर असलेल्या या शाळेला संजीवनी देण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने मुख्याध्यापक शिवाजी बुधवंत आणि उपशिक्षक राजेंद्र बोडखे प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. येथे वर्गानुसार पटसंख्येवर नजर टाकली असता इयत्ता सहावी आणि सातवी वर्ग पूर्णपणे बंद पडले असून, पहिली - ३, दुसरी - ७, तिसरी - ३, चौथी - ५, पाचवी - ५, असे अवघे २३ विद्यार्थी आजरोजी शिक्षण घेत आहेत.

काय आहे धोरण?

पहिली ते पाचवीपर्यंत किमान २१ विद्यार्थी असतील तर दोन शिक्षक कार्यरत असतात. २१ पासून ६० विद्यार्थ्यांपर्यंत दोन तर ६१ पासून पुढे तिसऱ्या शिक्षक पदाला मान्यता मिळते.

शिक्षकद्वयींची पराकाष्टा

मुख्याध्यापक शिवाजी बुधवंत आणि उपशिक्षक राजेंद्र बोडखे हे दोन शिक्षक या शाळेत कार्यरत असून, शाळेत विद्यार्थीसंख्या वाढावी आणि टिकून राहावी, यासाठी भर उन्हाळ्यात शाळा पूर्वतयारी अभियानाच्या माध्यमातून त्यांनी पालक भेटी घेऊन समुपदेशन केले. मात्र गावकऱ्यांची उदासीनता पराकोटीला पोहोचल्याने केवळ चार विद्यार्थी आज पहिलीत केवळ तीन विद्यार्थी दाखल झाले आहेत. (latest marathi news)

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष ?

जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असताना गावातील लोकप्रतिनिधींकडून व्यापक स्वरूपात प्रयत्न होताना दिसत नाहीत. शासन -प्रशासन, गावकरी, माजी विद्यार्थी या साऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नातून जिल्हा परिषद मराठी शाळा आपले अस्तित्व टिकवू शकते, यात शंका नाही.

...तर शाळेचे अस्तित्व संपुष्टात

शासनाच्या शिक्षण आणि क्रीडा विभागातर्फे 'समूह शाळा' नावाची संकल्पना गेल्या वर्षी समोर आली. या संकल्पनेनुसार वीसपेक्षा कमी पट असणाऱ्या शाळांचे एकत्रिकरण करून 'समूह शाळा' बनविणे विचाराधीन आहे २०२१-२२ च्या आकडेवारीनुसार वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या १४ हजार ७८३ शाळा राज्यात सुरू आहेत.

या सर्व शाळांमध्ये १ लाख ८५ हजार विद्यार्थी शिकत आहेत तर २९ हजार ७०७ शिक्षक या शाळांमध्ये कार्यरत आहेत. वीसपेक्षा कमी पटसंख्या झाली तर पहूर कसबे येथील जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा देखील आपले स्वतंत्र अस्तित्व गमावून बसेल.

"शाळेत पटसंख्या वाढविण्यासाठी मुख्याध्यापक आणि शिक्षक प्रयत्न करत आहेत. शाळा टिकविण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी मदत करेल."

- रामकृष्ण लोहार, गटशिक्षणाधिकारी, जामनेर

"जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा हे आमच्या गावाचे वैभव आहे. शाळा टिकविण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत असून, डॉ. जितेंद्र घोंगडे, अनिल जाधव, गुलाब बावस्कर, विक्रम घोंगडे आदींचे सहकारी मिळत आहे."- दिलीप बाविस्कर, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT