Jalgoan Fill the district agriculture department blank post Gulabrao Patil Ultimatum  sakal
जळगाव

जळगाव : कृषी विभागातील जागा भरा,अन्यथा मंत्रालय हलवून टाकेन

गुलाबराव पाटील यांचा कृषिमंत्र्यांना अल्टिमेटम

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यातील कृषी विभागातील रिक्त जागा भरण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील शुक्रवारी चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. रिक्त जागा भरण्यासाठी त्यांनी चक्क आपल्याच पक्षाच्या मंत्र्याकडे असलेल्या कृषी खात्याला अल्टिमेटम दिला आहे. मे अखेरपर्यंत जिल्ह्यामधील कृषी विभागातील जागा न भरल्यास ‘मंत्रालय हलवून टाकेन’ अशा शब्दात ते व्यक्त झाल्याचे पाहायला मिळाले.

‘सकाळ’ने कृषी विभागातील रिक्त पदांबाबत नुकतेच वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत पालकमंत्री पाटील यांनी मंत्रालयात रिक्त पदे भरण्याबाबतची माहिती घेतली. जळगाव जिल्ह्यातील कृषी विभागातील रिक्त पदे येत्या ३१ मे अखेर भरली जातील, असे आश्‍वासन राज्याचे कृषी सचिव, कृषी मंत्र्यांनी दिले असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी दिली. पालकमंत्र्यांनी सांगितले, की अर्धा जळगाव जिल्हा केळी व कापूस पिकविणारा आहे. जर सैनिक नसतील तर लढाई कशी लढणार? खरीप हंगाम तोंडावर आहे.

शेतकऱ्यांवर विविध प्रकारची नैसर्गिक संकटे येतात. पिकाचे नुकसान होते. अनेक योजना राबवायच्या असतात. त्यात कृषी विभागात कर्मचारी नसतील तर कृषीचे काम कसे चालेल ? नाशिक विभागात कृषी विभागाची ९८ टक्के पदे भरली आहे. इतर जिल्ह्यातही कृषी विभागात पदे भरलेली आहे. मग केवळ जळगाव जिल्ह्यावरच अन्याय का ? दोन वर्षापासून कमी कर्मचारी संख्येवर कृषी विभाग सुरू आहे. रिक्तपदे भरा नाहीतर मंत्रालय हलवून टाकीन, असे सांगितल्याने मे महिन्याच्या अखेरीस ज्या बदल्या होतात त्यात जळगाव कृषी विभागाची रिक्त पदे भरण्याचे आश्‍वासन देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT