Activists of the Maratha community protest by hanging the image of state Home Minister Devendra Fadnavis in protest against police lathicharge on protesters in Jalna. esakal
जळगाव

Jalna Lathi charge: लाठीमार घटनेचे खानदेशात पडसाद! ठिकठिकाणी रास्ता रोको, ठिय्या आंदोलनासह राज्य सरकारचा निषेध

सकाळ वृत्तसेवा

Jalna Lathi charge : जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर शुक्रवारी (ता. १) पोलिसांनी लाठीमार केल्याच्या घटनेचे शनिवारी (ता. २) खानदेशात जळगाव, धुळे, नंदुरबारसह ठिकठिकाणी पडसाद उमटले.

या वेळी सकल मराठा समाजातर्फे रास्ता रोको, ठिय्या आंदोलन करण्यात आले.

तसेच राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला. (jalna Lathimar incident protest in Khandesh state government along with road block Thiya agitation at various places jalgaon)

चाळीसगाव येथील तहसील कार्यालयासमोर शनिवारी सकल मराठा समाजाच्या वतीने जालन्यातील लाठीमार घटनेचा निषेध करून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतीकात्मक प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले.

रावेर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी जालन्यात मराठा समाजबांधवांवर झालेल्या लाठीमार घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला.

राज्य शासनाचा निषेध करून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. या वेळी आंबेडकर चौकातील चारही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर वाहने थांबलेली होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पाचोरा येथील शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे लाठीमार घटनेचा निषेध करण्यात आला. महसूल व पोलिस विभागाला वैशाली सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.

वरणगाव (ता. भुसावळ) येथील बसस्थानक चौकात मराठा व इतर मागासवर्गीय समाजाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.

या हल्ल्यामागे मोठे षडयंत्र असून, याची सखोल चौकशी करण्याची मागणी या वेळी करण्यात आली. याप्रसंगी आंदोलकांनी शहरातील जुन्या महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

IT Park Kolhapur : कोल्हापुरात आय.टी. पार्कचा मार्ग अजून खडतर, कृषी महाविद्यालयाची मनधरणी करण्यातच जात आहेत दिवस

SCROLL FOR NEXT