जळगाव

Jalgaon NMU News : ‘उमवि’तील ‘पीईएएलडी’ स्वनिर्मित मशिनला पेटंट; भारत सरकारकडून गौरव

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील स्वनिर्मित ‘पीईएएलडी’ मशिन.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon NMU News : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील प्लाझ्मा इनहान्सड् ॲटामिक लेयर डिपोझिझन (पीईएएलडी) या स्वनिर्मित मशिनला भारत सरकारचे नुकतेच पेटंट प्राप्त झाले आहे.

विद्यापीठातील भौतिकशास्त्र प्रशाळेच्या इलेक्ट्रॉनिक विभागातील मटेरियल्स ॲन्ड डिव्हायसेस लॅबोरेटरी फॉर नॅनो इलेक्ट्रॉनिक्स क्लास १०००० क्लीन रूम’ (धूलिकणविरहित प्रयोगशाळा) मध्ये युनिफॉर्म ऑक्साईड नॅनो कोटिंगसाठी हे स्वयंचलित मशिन उपयोगात येत आहे.

इलेक्ट्रॉनिक्स विभागप्रमुख व प्रशाळा संचालक प्रा. अशोक महाजन यांना पेटंट नियंत्रकांकडून त्यासंबंधीचे पत्र नुकतेच प्राप्त झाले. (kbcnmu Plasma Enhanced Atomic Layer Deposition machine has recently received patent from Government of India jalgaon news)

सेमिकंडक्टर चीपनिर्मिती प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाचे असलेले MOS (मॉस) डिव्हाइस बनविण्यासाठी ऑक्साईडचे नॅनो कोटिंगसाठी उपयुक्त असलेल्या या मशिनची निर्मिती प्रा. अशोक महाजन यांनी त्यांच्या संशोधक विद्यार्थी डॉ. विलास पाटील व संशोधन कार्यातील सहकारी डॉ. ललित पाटील यांच्या सहकार्याने २०१५-१६ मध्ये केली होती.

या पेटंटप्राप्त यंत्राच्या हाताळणीचे प्रशिक्षण आजपर्यंत प्रा. महाजन यांचे संशोधक विद्यार्थी असलेले डॉ. अनिल खैरनार, डॉ. विलास पाटील, डॉ. खुशबू अग्रवाल, डॉ. विरल बऱ्हाटे, डॉ. सुमित पाटील, वैभव बोरोकर तसेच पदव्युत्तर विद्यार्थी अभिषेक चौधरी, भूषण देसले, यशल नारखेडे, मनीष पाटील व अश्विनी घाटे आदी विद्यार्थ्यांनी घेतले असून, त्यांनी धूलिकणविरहित अद्ययावत प्रयोगशाळेत पूर्ण MOS (मॉस) डिव्हाइसेस फॅब्रिकेशन व कॅरेक्टे रायजेशनचे प्रशिक्षण घेतले आहे. प्रा. महाजन व विद्यापीठातर्फे भारताच्या ‘इंडिया सेमिकंडक्टर मिशन’मध्ये हे ग्रामीण भागातील महत्त्वाचे योगदान असावे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

‘मेक इन इंडिया’चा आविष्कार

विद्यापीठात निर्माण केलेले हे पीईएएलडी मशिन भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ व ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेंतर्गत टाकलेले एक महत्त्वपर्णू पाऊल असल्याचे या पेटंटद्वारे सिद्ध झाले आहे.

३५ लाखांत निर्मिती

अत्यंत कमी किमतीत अंदाजे ३५ लाख रुपये निर्मिती केलेल्या या मशिनचे बाजारमूल्य सुमारे १.२० ते १.५० कोटी एवढे असून, हे मशिन अत्यंत प्रभावीपणे नॅनोफिल्मस् डिपॉझिशनचे काम करीत आहे. या मशिनच्या पेटंटसाठी प्रा. महाजन यांनी २०१६ मध्ये विद्यापीठामार्फत प्रस्ताव सादर केला होता. त्यातील परीक्षण व इतर सर्व प्रक्रिया करून आता २० वर्षांसाठी हे पेटंट मंजूर झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

SCROLL FOR NEXT