Khadse file defamation case against BJP MLA Mangesh Chavan jalgaon news esakal
जळगाव

Eknath Khadse : भाजप आमदार मंगेश चव्हाणांविरुद्ध खडसेंतर्फे अब्रूनुकसानीचा दावा

सकाळ वृत्तसेवा

Eknath Khadse : भारतीय जनता पक्षाचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या विरुद्ध माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी अब्रूनुकसानीचा दावा न्यायालयात दाखल केला आहे. त्यात एकनाथ खडसे यांचे जबाब नोंदविण्यात आले.

भारतीय जनता पक्षाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत एकनाथ खडसे यांना करंटा, निकम्मा असे बदनामीकारक शब्द वापरले, असे याचिकेत म्हटले आहे. (Khadse file defamation case against BJP MLA Mangesh Chavan jalgaon news)

यात एकनाथ खडसे यांचा काहीही संबंध नसतांना हे शब्द वापरून त्यांची बदनामी व अब्रूनुकसानी केल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी भारतीय दंड विधान ४९९, ५०० माहिती आणि तंत्रज्ञान कायदा ६६ ‘अ’ प्रमाणे फौजदारी व अब्रूनुकसानीचा दावा खडसे यांनी दाखल केला आहे.

या प्रकरणी जळगाव जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश आर. वाय. खंदारे यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यात एकनाथ खडसे यांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. खडसे यांच्यातर्फे ॲड. अतुल सूर्यवंशी काम पाहत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

एकनाथ खडसे यांनी यापूर्वीही शिवसेना (शिंदे गट) नेते व राज्याचे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरुद्ध अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला होता. या प्रकरणी जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू असताना पाटील यांनी माफी मागितल्यास आपण खटला मागे घेण्यास तयार आहोत, असे म्हटले होते.

त्यावर मंत्री पाटील म्हणाले होते, एकनाथ खडसे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आपल्या घरी चहा पिण्यासाठी यावे. त्यानंतर खडसे यांनी अब्रूनुकसानीचा दावा मागे घेतला होता. खडसे यांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर दाखल केलेल्या अब्रूनुकसानीच्या दाव्यात पुढे काय होणार, याकडेच आता जनतेचे लक्ष आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शरद पवारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, दिल्लीत घडामोडींना वेग; सुप्रिया सुळेही सोबत, काय झाली चर्चा?

NEET वादावरून धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा का घेतला जात नाही?; मोदी सरकारच्या भूमिकेची Inside Story... 8 प्रमुख कारणे

Live Updates Marathi : मनोज जरांगे यांनी घेतली अभिजीत दीपकेंची भेट

Monsoon Update : मॉन्सूनसाठी पुढील काही दिवस महत्त्वाचे ! 'एल निनो'चे सर्वात धोकादायक रूप पाहायला मिळणार, दक्षिण भारतात दुष्काळसदृश्य परिस्थिती

निवृत्तीनंतर अरिजित सिंगचं मोठं कमबॅक! 'या' सिनेमासाठी पुन्हा धरला माईक, भावनिक नात्यासाठी पुनरागमन

SCROLL FOR NEXT