sakal
जळगाव

खडसेंच्या वाढदिवसाला ठरला ‘करेक्ट कार्यक्रम’

कैलास पाटील, इंदिरा पाटलांच्या प्रवेशाने साधला अखेर मुहूर्त

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शिवसेनेचे माजी आमदार कैलास पाटील व महिला आघाडीच्या नेत्या इंदिरा पाटील यांनी शनिवारी (ता. २५) राष्ट्रवादीत प्रवेश केला खरा मात्र, या प्रवेशाचा पहिला अंक माजी मंत्री एकनाथ खडसेंच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला म्हणजे १ सप्टेंबरलाच लिहिला गेल्याचे स्पष्ट झाले आहे.

शुक्रवारी (ता. २४) बोदवडच्या नगराध्यक्ष, नगरसेवकांनी राष्ट्रवादीची व पर्यायाने खडसेंची साथ सोडून सेनेचे शिवबंधन हाती बांधल्यानंतर शनिवारी सेनेचे माजी आमदार कैलास पाटील व इंदिरा पाटील यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश सेनेला धक्का मानला जात आहे.

१ तारखेस ठरला कार्यक्रम

खडसेंच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला १ सप्टेंबर २०२१ रोजी शिवसेनेचे माजी आमदार कैलास पाटील व जिल्हा बॅंकेच्या माजी संचालक व सेनेच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा इंदिरा पाटील यांनी त्यांना शुभेच्छा देऊन सदिच्छा भेट घेतली होती. या भेटीतच दोघांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाचा कार्यक्रम ठरला. परंतु, महाविकास आघाडीच्या ठरलेल्या सूत्रानुसार, ‘आघाडीतील पक्षाच्या पदाधिकारी यांना प्रवेश देताना आघाडी धर्माचे पालन करावे’ असे ठरलेले असल्याने, राष्ट्रवादीकडून त्यांचा पक्षप्रवेश थांबवला गेला.

बोदवडच्या नाट्यानंतर...

मात्र, शुक्रवारी बोदवड व मुक्ताईनगर येथील राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांना शिवसेनेने प्रवेश दिल्याने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना देखील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश देण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे कैलास पाटील, इंदिरा पाटील व पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश दिला गेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माजी पंतप्रधानांच्या मुलासोबत व्हॉट्सॲपवर सायबर फ्रॉड; 7.8 कोटी रुपये अकाऊंटमधून गायब, अशा परिस्थितीत कसं सुरक्षित राहायचं? पाहा

Ambajogai Crime: अंबाजोगाईत धक्कादायक घटना! अभ्यासिकेतून परतणाऱ्या १२ वीच्या विद्यार्थ्यावर मध्यरात्री जीवघेणा हल्ला; जखमी अवस्थेत आईला शेवटचा फोन

Nanded: ॲपेतून डिझेल वाहतुकीचा धंदा; सुरक्षा नियमांची ऐशी तैशी !, इतरांचा जीव धोक्यात

Manoj Jarange : हैदराबाद गॅझेटचा प्रश्न मार्गी; कुणबी प्रमाणपत्रासाठी उद्यापासून अर्ज करा, जरांगेंचं आवाहन, नोंदी नसल्या तरी चिंता नाही

Fifa World Cup 2026: हे नाव लक्षात ठेवा, Jonathan David! पठ्ठ्याने ९६ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी केली बरोबरी, १९६६चा आणखी एक पराक्रम मोडला

SCROLL FOR NEXT