kirankumar bakale
kirankumar bakale esakal
जळगाव

Kirankumar Bakale Controversy : प्रकरणाचा तपास डीवायएसपींकडे

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्‍हा पोलिस दलातून निलंबित गुन्हे शाखा निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्याविरुद्ध दाखल गुन्ह्याचा तपास पोलिस उपअधीक्षक संदीप गावित यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. शुक्रवारी (ता. ७) औरंगाबाद खंडपीठात त्याच्या अटकपूर्व जामिनावर कामकाज होत आहे.

मराठा समाजाप्रति आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी निरीक्षक बकाले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. मराठा समाजाकडून तीव्र भावना उमटून आंदोलन मोर्चे काढण्यात आले.(Kirankumar Bakale Controversy Investigation case handle to DYSP Jalgaon news)

प्रकरण चिघळत जात असतानाच जिल्‍हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळून लावल्याने बकाले यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून, त्यावर शुक्रवार कामकाज होत आहे. दरम्यान, या गुन्ह्याच्या तपासावर आक्षेप घेतल्याने पोलिस अधीक्षकांनी गुन्ह्याचा तपास आता पोलिस उपअधीक्षक गावित यांना सोपविला.

पाच पथके तयार

किरणकुमार बकाले व अशोक महाजन या दोघांच्या शोधार्थ विविध पाच पथके नव्याने तयार करण्यात आली आहेत. त्यात गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अमोल देवरे यांच्यासह चार कर्मचारी आणि मुख्यालयातील मातब्बर कर्मचाऱ्यांची पाच पथकांत विभागणी करून उपलब्ध माहितीच्या अधारे त्यांचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Traffic advisory : मुंबईत PM नरेंद्र मोदींची जाहीर सभा; गर्दी टाळण्यासाठी वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Cotton Seeds : पहिल्याच दिवशी कपाशी बियाण्यांचा अत्यल्प पुरवठा; आजपासून कापूस बियाणे विक्रीचा होता मुहूर्त

MS Dhoni: धोनी RCB ला देणार सरप्राईज? CSK ने शेअर केलेल्या त्या व्हिडिओने चर्चांना सुरुवात

Share Market Today: अमेरिकन बाजार विक्रमी उच्चांकावरून कोसळले; भारतीय शेअर बाजारात कशी असेल स्थिती?

Devendra Fadnavis: "सिंचन घोटाळ्याप्रकरणी आरोप चुकीचे नव्हते, तेव्हा..."; देवेंद्र फडणवीसांनी मनातलं बोलून दाखवलं

SCROLL FOR NEXT