kishor patil
kishor patil esakal
जळगाव

Kishor Patil | जनतेच्या विश्‍वासावर पुन्हा मिळविणार सत्ता : किशोर पाटील

सकाळ वृत्तसेवा

नांद्रा (जि. जळगाव) : राज्यातील सत्तांतरानंतर प्रथमच पाचोरा-भडगाव मतदारसंघात बाजार समितीच्या निमित्ताने पहिली सार्वत्रिक निवडणूक होत असून, या निवडणुकीत आपल्यावर जनतेचा असलेला विश्वास तसेच कार्यकर्त्यांच्या बळावर आपण पुन्हा सत्ता हस्तगत करून बाजार समितीला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देऊ, असे प्रतिपादन आमदार किशोर पाटील यांनी केले. (Kishor Patil statement about Power will be regained on trust of people jalgaon news)

खेडगाव (ता. पाचोरा) येथील किशोर पाटील बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या प्रांगणात बुधवारी (ता. २९) दुपारी एकला झालेल्या नवीन पदाधिकारी निवड व प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

या वेळी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, उपजिल्हा प्रमुख गणेश पाटील, तालुकाप्रमुख सुनील पाटील, जिल्हा परिषद सदस्य पदमसिंग पाटील, माजी सभापती पंढरीनाथ पाटील, इंदल परदेशी, युवासेना तालुका प्रमुख योगेश पाटील, शहर प्रमुख किशोर बारावकर, अविनाश कुडे, चंद्रकांत धनवडे, शिवदास पाटील, वसंत पाटील यांची उपस्थिती होती.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

यावेळी आमदार पाटील म्हणाले, की बाजार समिती ही शेतकऱ्यांची संस्था असून, विरोधकांची निवडणूक बिनविरोध करायची तयारी असल्यास आपण देखील मागे हटणार नाही, असे सांगत गतकाळात बाजार समितीत तांत्रिक मुद्दे उकरून विरोधकांनी काही काळ सत्ता हस्तगत केली. मात्र सत्ता काळात त्यांनी शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास देत मोक्याच्या जागा विक्रीची घाट घातला असल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला.

सहकारात आपण कधीही राजकारण करणार नाही. त्यामुळे समविचारी मंडळींनी युती/ आघाडीसाठी साद घातल्यास आपण शेतकरी हितासाठी सदैव तयार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी उपजिल्हाप्रमुख गणेश पाटील, तालुकाप्रमुख सुनील पाटील, जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांची भाषणे झाली. त्यांनी भाषणातून सतीश शिंदे यांच्या काळातील गैरव्यवहारावर टीका केली. प्रवीण ब्राह्मणे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले तर जिल्हा परिषद सदस्य पद्मसिंह पाटील यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : अय्यरची 70 धावांची खेळी, मुंबईसमोर विजयासाठी 170 धावांच आव्हान

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

Latest Marathi News Live Update: ...तर मोदींबरोबर गेलेलं का चालत नाही- अजित पवार

SCROLL FOR NEXT