crime news esakal
जळगाव

Jalgaon : प्लॉट विक्रीचे पैसे मागणाऱ्या भाऊ-बहिणीवर चाकू हल्ला

याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : प्लॉट विक्रीचे पैसे दिले नाही म्हणून विचारणा करणाऱ्या महिलेसह तिच्या लहान भावाला शिवीगाळ करून चाकूने वार करत जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीत नमुद केल्याप्रमाणे, शबाना शेख सलीम (वय ३५, रा. न्यू ख्वाजानगर, पिंप्राळा हुडको) ही महिला आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहेत. त्यांनी त्यांचा प्लॉ‍ट विक्री केला होता. याचे पैसे शरिफ शेख याला मागितले असता याचा राग येउन गुरूवारी (ता. १९) सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास महिलेसह तिचा भाऊ नईम शेख यांना शिवीगाळ करून चाकूने वार करून जखमी केले. तसेच आसिफ शेख आणि अहमद शेख (पूर्ण नाव माहित नाही) यांनी नईमला मारहाण करून डोक्यात दगड टाकून दुखापत केली. याप्रकरणी शबाना शेख सलीम यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेउन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शुक्रवारी (ता. २०) संशयित आरोपी शरिफ शेख, आसिफ शेख आणि अहमद शेख यांच्याविरोधात रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक विनोद सूर्यवंशी करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी ! पगार अन् पेन्शनमध्ये होणार मोठी वाढ, पुढील आठवड्यात सरकार करणार घोषणा ?

Dharashiv News: २५% अटीत अडकली दहिफळची दारूबंदी चळवळ!; महिलांचा निर्धार ठाम.

Latest Marathi News Live Update : खरातची अज्ञातस्थळी चौकशी, एसआयटीने चौकशीचं ठिकाण बदललं

IPL 2026: 'एक मिनिटही वाया घालवू नका, गेल्यावर्षी जिंकलो त्यामुळे...' विराट कोहलीचा RCB च्या खेळाडूंना सल्ला

Plant Care in Summer: कडक उन्हात बाग वाचवायची कशी? जाणून घ्या सोपे उपाय!; उन्हाळ्यात झाडांची ‘तहान’ भागवा

SCROLL FOR NEXT