Crime news  esakal
जळगाव

भांडणाची मध्यस्थी आली अंगलट; जळगाव MIDC मध्ये दोघांवर चाकू हल्ला

अज्ञात टोळक्याने भांडण सोडविणाऱ्यावर चाकू हल्ला केला.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील गोदावरी कॉलेज चौकाजवळील चहा टपरीजवळ सुरी असलेले भांडण सोडवीत असताना, अज्ञात टोळक्याने भांडण सोडविणाऱ्यावर चाकू हल्ला केला. (Latest Marathi News)

सुशील मनोज जाधव (वय २०, रा. सुधाकरनगर, एमआयडीसी) मित्र राकेश गोपाल पाटील यांच्यासोबत रात्री आठला राष्ट्रीय महामार्गावरील गोदावरी कॉलेज चौकात माऊली साई टी सेंटरवर चहा पित होता. त्यावेळी कालिकामाता मंदिराकडून भरधाव वेगाने ट्रीपलसीट आलेल्या दुचाकीस्वारांनी नेमके चहा टपरीजवळच एका गरीब सायकलस्वारास धडक दिली.अपघातात सायकलचे नुकसान झाल्याने वाद सुरू झाला. हा वाद मिटविण्यासाठी प्रत्यक्षदर्शी राकेश पाटील, सुशील जाधव आणि बाजूला उभा असलेला बेकरीवाला सुरेश पाटील यांनी मध्यस्थी केली असता, यातील अनोळखी तरुणाने त्याच्या हातातील धारदार चाकू काढून राकेश पाटील यांच्या पोटावर, तर बेकरीवाला पाटील यांच्या पाठीवर सपासप वार केले.

दोघांना रक्तबंबाळ करून हल्लेखोरांनी पळ काढला. याबाबत माहिती मिळाल्यावर एमआयडीसी पोलिस घटनास्थळी पोचले. जखमी राकेश पाटील याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. या घटनेबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक नीलेश गोसावी तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: १५० हून अधिक खटले, फाशीची भीती... तरीही शेख हसीना डिसेंबरमध्ये बांग्लादेशात का परतणार? जाणून घ्या कारण...

MD Drugs Crackdown: रत्नापूर प्रकरणानंतर राज्यात एमडी ड्रग्जचे जाळे उघड; अमरावती, कोल्हापूर, जळगाव, कळंब येथेही जप्ती

Shehbaz Sharif: ''भारताच्या बेकायदेशीर कारवाईला सात वर्षे पूर्ण, पण...'', 'कलम 370'वरुन पाकच्या पंतप्रधानांचे भारतावर गंभीर आरोप

Land Scam : बनावट कागदपत्रांद्वारे कोट्यवधींची जमीन हडपण्याचा प्रयत्न; तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Cooperative Scam: पतसंस्थेतील आठ लाखांची बचत बुडाल्याचा धक्का; मानसिक तणावातून शेतकऱ्याची गळफास घेऊन जीवन संपविले.

SCROLL FOR NEXT