Court order esakal
जळगाव

Jalgaon Kotecha Case : संस्थाध्यक्षा कोटेचा यांची याचिका खंडपीठाने फेटाळली

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : प्राचार्य नियुक्तीबाबत विद्यापीठाच्या आदेशाला आव्हान देणारी येथील श्री सरस्वती विद्याप्रसारक मंडळ संचालित श्रीमती प. क. कोटेचा महिला महाविद्यालयाची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने फेटाळून लावली. (kotecha case bench rejected petition of institute president Kotecha jalgaon news)

कोटेचा महाविद्यालयाने प्राचार्या मंगला साबद्रा यांच्या निवृत्तीनंतर त्यांना मुदतवाढ देऊन प्राचार्यपदी कायम ठेवण्याचा प्रयत्न चालविला आहे. संस्थेने या पदासाठी अर्ज मागविल्यानंतर सर्व अर्ज अवैध ठरविण्यात आले.

मात्र, विद्यापीठाच्या समितीने प्राप्त आठपैकी चार अर्ज वैध ठरवून संस्थेस या अर्जांना विचारात घेऊन प्राचार्य नियुक्तीची प्रक्रिया पार पाडावी, असे निर्देश दिले होते. संस्थाध्यक्षा पद्मा कोटेचा यांनी याविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात विद्यापीठ, शिक्षण सहसंचालक व राज्य सरकारविरुद्ध याचिका दाखल केली होती. या याचिकेत भुसावळ येथील डी. एम. राठी यांनी हस्तक्षेप याचिका दाखल करून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याबाबत विनंती केली होती.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

त्यांच्यातर्फे ॲड. शंभूराजे देशमुख यांनी युक्तिवाद केला. विद्यापीठातर्फे ॲड. वाय. बी. बोलकर यांनी यासंदर्भातील दोनही पत्र न्यायालयासमोर सादर केली. त्यामुळे न्यायमूर्ती रवींद्र घुगे व संजय देशमुख यांच्या द्विसदस्यीय पीठाने श्रीमती कोटेचा यांची याचिका फेटाळली. कोटेचा यांच्यातर्फे ॲड. सुशांत दीक्षित यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

D Gukesh: ज्या कार्लसनने 'कमजोर' म्हणून हिणवलं, त्याच्याच नाकावर टिच्चून गुकेशनं 'रॅपिड' स्पर्धेचं जेतेपद जिंकलं

Nagpur News: ऐकावं ते नवलच! मृत व्यक्तीला दिलं रहिवासी प्रमाणपत्र; वाडी नगरपरिषदेच्या कारभारावर गंभीर प्रश्न

SCROLL FOR NEXT