bribe case esakal
जळगाव

Jalgaon Bribe News : खिरोद्याच्या तलाठ्यासह कोतवाल लाचेच्या जाळ्यात..

सकाळ वृत्तसेवा

सावदा (जि. जळगाव) : सातबारा उताऱ्यावर मृत भावाची पत्नी व मुलाचे नाव लावण्यासाठी चार हजारांची लाच घेणाऱ्या खिरोदा येथील तलाठ्यासह कोतवालास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. (Kotwal along with talathi arrested while accepting bribe of 4 thousand jalgaon bribe news)

तक्रारदाराची वडिलोपार्जित शेती खिरोदा तलाठी कार्यालयाच्या हद्दीत आहे. तक्रारदाराचे मोठे भाऊ मृत झाल्याने संबंधित शेतजमिनीच्या सात-बारा उताऱ्यावर मृत भावाची पत्नी व मुलगा यांचे नावे वारस म्हणून नोंद घेण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे पंचासमक्ष तलाठी प्रमोद प्रल्हाद न्यायदे (वय ४५, रा. गणेश कॉलनी, फैजपूर, ता. यावल) आणि कोतवाल शांताराम यादव कोळी (वय ५२, खिरोदा तलाठी कार्यालय) यांनी चार हजारांची लाच मागितली.

ही लाच रक्कम तलाठी आणि कोतवाल यांच्या उपस्थितीत पंचासमक्ष स्वतः खिरोदा तलाठी कार्यालय येथे स्वीकारली. या प्रकरणी तलाठी प्रमोद न्हायदे व कोतवाल शांताराम कोळी यांच्याविरुद्ध सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

ही कारवाई जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक तथा पर्यवेक्षण अधिकारी शशिकांत पाटील, पोलिस निरीक्षक तथा तपास अधिकारी एस. के. बच्छाव, पोलिस कर्मचारी ईश्वर धनगर, राकेश दुसाने यांनी केली. तर कारवाई मदत म्हणून सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, सहाय्यक फौजदार सुरेश पाटील, पोलिस कर्मचारी अशोक अहिरे, सुनील पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर, जनार्दन चौधरी, बाळू मराठे, प्रदीप पोळ, अमोल सूर्यवंशी, प्रणेश ठाकूर यांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT