lake 
जळगाव

अचानक मोठा आवाज झाला आणि तलावाची भिंत फुटली; मग काय एकच धावपळ 

विनोद सुरवाडे

वरणगाव : येथून जवळच विल्हाळे शिवारात दीपनगर विद्युत केंद्र प्रशासनाने प्रकल्पातील राखमिश्रित पाणी सोडण्यासाठी कोट्यवधींचा शासकीय निधी खर्च करून तलावांची निर्मिती केली आहे. या तलावाची भिंत फुटून राख भरणाऱ्य़ा मजुरांची धावपळ उडाली. 
 


वीज प्रकल्पात वीज निर्मितीसाठी दररोज शेकडो टन कोळशाची राख तयार होते. त्या राखेची विल्हेवाट लावण्यासाठी येथून जवळच विल्हाळे शिवारातील वन विभागाच्या मोकळ्या जागेत शासनाचा निधी खर्च करून तलावांची निर्मिती केलेली आहे. या तलावामध्ये दहा किलोमीटर पाइपलाइनच्या सहाय्याने राख आणि पाणीमिश्रित स्वरूपात सोडण्यात आलेली आहे. हे तलाव पूर्ण क्षमतेने भरू नये, या दृष्टीने दीपनगर प्रशासनाने कोणालाही केव्हाही विनामूल्य राख वाहून नेण्याची मुभा दिलेली आहे.

अचानक मोठा आवाज झाला

त्याच अनुषंगाने शुक्रवारी (ता. १८) रात्री दोनला २५ ते ३० मजूर वाहनांमध्ये राख भरत असताना अचानक काहीतरी आवाज आला आणि क्षणात मजुरांपर्यंत पाण्याचे लोंढे आल्याने त्यांनी तेथून पळ काढला. 

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दुर्घटना
भल्या मोठ्या व्यासाच्या तलावात राख वगळता पाण्याचा निचरा व्हावा, यासाठी तलावामध्ये ठिकठिकाणी बांध तयार केले आहेत. शासन निर्णयानुसार सदर बांध भविष्यात फुटले जाणार नाही किंवा त्यापासून कोणाला त्रास होणार नाही, त्या दृष्टीने प्रशासनाने मुरूम-माती आणि दगडांच्या पिंचीगप्रमाणे अंतर्गत बांध तयार करणे आवश्यक असताना दीपनगर प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे संबंधित ठेकेदारांनी मुरूम-माती आणि दगडांच्या पिचऐवजी सदर बांध राखेचे वरम करून त्यावर तलावाबाहेरील माती टाकून तयार केले आहे.  
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case: अशोक खरातच्या मुलाने दिली धक्कादायक कबुली... आई कुणाकडे पैसे द्यायची? उत्तर ऐकून पोलिसही चक्रावले

Gold Rate Today: युद्धाचा परिणाम! सोन्याच्या भावात मोठी उलथापालथ; पाहा ताजे भाव

Solapur Car Accident : पहाटे भीषण अपघात ! कार कॅनॉलमध्ये कोसळली, जावई बचावला मात्र पत्नीसह सासू-सासऱ्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

Latest Marathi News Live Update : साखरपा येथे खाजगी प्रवाशी ट्रॅव्हल्स जळून खाक, मोठा अनर्थ टळला

Good Friday 2026: आज 'हॅपी गुड फ्रायडे' का म्हणत नाहीत? जाणून घ्या यामागचं खरं कारण आणि इतिहास

SCROLL FOR NEXT