Water Supply sakal
जळगाव

Water Wastage : भुसावळ रेल्वेस्थानकावर लाखो लिटर पाण्याची नासाडी

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : येथील रेल्वेस्थानकावर प्रशासनातर्फे प्रवाशांना पाणी पिण्यासाठी नळ लावण्यात आले आहेत.

मात्र, महिनाभरापासून यातील काही नळ तुटलेल्या अवस्थेत असून, तोट्या नसल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. याकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. (Lakhs of liters of water was wasted at Bhusawal railway station jalgaon news)

रेल्वेस्थानकावरील पिण्याचे पाण्याचे काही माथेफिरूंनी तोडल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. ऐन उन्हाळ्याच्या दिवसात प्रवासी ट्रेनमधून उतरून सरळ पाण्याच्या नळाकडे धाव घेतात.

मात्र गेल्या महिन्याभरापासून रेल्वेस्थानकावरील नळ तुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी होत असून पाणी प्लॅटफॉर्मवर दिवस- रात्र वाहत असल्याने प्रवाशांना आपला जीव मुठीत धरून रेल्वेगाडीत चढावे लागत आहे व रेल्वे प्रशासन उघड्या डोळ्यांनी बघत एखादा अपघात होण्याची वाट पाहत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पाणी पिण्यायोग्य आहे का?

एकीकडे पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकंती करण्याची वेळ आली आहे. शहराला ज्या हतनूर धरणातून पाणी पुरवठा होतो, त्याच धरणातून रेल्वे प्रशासनाला पुरवठा केला जातो. मग एवढ्या मोठ्या प्रमाणात रेल्वे दैनंदिन पाणीपुरवठा लाखो प्रवाशांना करते तरी कोठून ही एक संशोधनाची बाब आहे. रेल्वे स्थानकावरील

पाणी पिल्याने जर एखाद्या प्रवाशाच्या प्रकृतीत बिघाड झाला तर याला जबाबदार कोण राहणार? रेल्वेस्थानकावर बिनधास्त कुठल्याही कंपनीचे ट्रेड नसलेले पाणी विक्री होत असून. ते पाणी पिण्यायोग्य आहे का? याबाबत संभ्रम आहे. प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या पाणी विक्रेत्यांची अन्न व औषधी विभाग कार्यालयाद्वारे तपासणी होणे गरजेचे आहे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Update : अचानक फोनची कॉलिंग स्क्रीन वेगळी दिसतेय? पटकन जाणून घ्या तुमच्या मोबाईलला काय झालंय

Ganeshotsav : ठाणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी, गणेशभक्त तब्बल २५ तास रांगेत उभे, कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळेना

Glycemic Index: मधुमेही खजूर खाऊ शकतात का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Crime News: डोळ्यांदेखत पतीवर चाकूचे १६ वार, मला न्याय द्या! कुटुंबावरील हल्ल्यात खून झालेल्या प्रमोदच्या पत्नीची पोलिसांना विनंती

SCROLL FOR NEXT