latest crime news esakal
जळगाव

जामनेरला LCBची धडक कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त, 4 जण ताब्यात

अनेक दिवसांपासून अवैध गावठी दारूची सर्रासपणे विक्री होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

प्रतीक जोशी

जामनेर (जि. जळगाव) : तालुक्यातील शहापूर, गोंडखेड आणि मुंदखेडा येथील गावठी दारूच्या भट्टयांवर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करून सुमारे पावणेदोन लाखांचे गावठी दारू बनविण्याचे साहित्य जप्त केले. ही धडक कारवाई बुधवारी (१७) सकाळपासून सुरू करण्यात आली होती. अनेक दिवसांपासून तालुक्यासह परिसरात अवैध गावठी दारूची सर्रासपणे विक्री होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) तीन पथकांद्वारे वेगवेगळ्या ठिकाणी या धाडी घालण्यात आल्या. (Latest Marathi News)

मोहिमेचे नेतृत्व पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी केले होते. सहाय्यक फौजदार अशोक महाजन, पोलिस हवालदार जितेंद्र पाटील, महेश महाजन, प्रीतम पाटील, भारत पाटील यांनी शहापूर तर सहाय्यक फौजदार अनिल जाधव, पोलिस हवालदार संदीप पाटील, किशोर राठोड, भगवान पाटील, विजय चौधरी यांनी गोंडखेड आणि सहायक फौजदार युनूस शेख, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, रणजित जाधव, कृष्णा देशमुख यांच्या पथकाने मुंदखेड शिवारात कारवाई केली.

या कारवाईत चार संशयिताना ताब्यात घेण्यात आले. एक जण पसार होण्यात यशस्वी झाला. ताब्यात घेतलेल्यांमध्ये विनोद सुंदरलाल जोशी, नसीर रशीद तडवी (दोघे रा. वाकडी), रामा कौतिक कोळी, देविदास आनंदा कोळी (दोघे रा. गोंडखेड) तर संजय धनराज पवार (रा महुखेडा) हा फरार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT