jalgaon municipal corporation sakal
जळगाव

जळगाव महापालिकेची महासभा ऑफलाइन; सुनील गोराणे

प्रशासनातर्फे नगरसेवकांना दुरुस्तीचे पत्र पाठविणार

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : महापालिकेची सभा ऑनलाईन घेण्याबाबत अजेंडा प्रसिध्द करण्यात आला होता, मात्र शासनाचे बुधवारी (ता. १६) रात्री उशीरा ऑफलाईन सभा घेण्याचे पत्र प्राप्त झाल्याने महापालिकेची २४ मार्च रोजी सभा ऑफलाईन होणार असल्याची माहिती नगरसचिव सुनील गोराणे यांनी दिली आहे, याबाबत नगरसेवकांना दुरुस्ती पत्रके पाठविण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

जळगाव महापालिकेच्या महासभेचा अजेंडा नगरसचिव यांनी प्रसिद्ध केला आहे. २४ मार्च रोजी दुपारी बारा वाजता ही सभा ऑनलाईन घेण्यात येणार असल्याचे त्यात नमूद करण्यात आले होते. विशेष म्हणजे सभा ऑनलाईन घेण्याबाबत महाराष्ट्र शासनाचे ३ जानेवारी २०२२ च्या पत्राचा संदर्भही यात दिला होता देशात चार राज्याच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या, देशातील लोकसभा व राज्यसभेचे अधिवेशन ऑफलाईन पद्धतीने होत आहे, तर राज्यातील विधानसभा व विधानपरिषदेचे कामकाजही ऑफलाईन सुरू आहे. जळगाव जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ऑफलाईन झाली. मग जळगाव महापालिकेच्या महासभेसाठीच शासनाचा ऑनलाईन पद्धतीने का होत आहे, असा प्रश्‍न नगरसेवकांना पडला होता. ऑफलाईनच सभा व्हावी, अशी नगरसेवकांची मागणी होती. मात्र अजेंडा प्रसिध्द झाल्यानंतर व ते वितरित झाल्यानंतर बुधवारी (ता. १६) रात्री उशीरा शासनाचे पत्र महापालिकेला ऑफलाईन सभा घेण्यासाठी प्राप्त झाल्याने ही सभा आता ऑफलाईन होणार असल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आले. सतरा मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात २४ मार्च रोजी दुपारी बारा वाजता महापौर जयश्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होणार आहे.

४१ विषयांवर चर्चा

महापालिकेच्या ऑनलाईन महासभेत एकूण ४१ विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. यात दहा प्रशासकीय प्रस्ताव, २४ अशासकीय प्रस्ताव तर पुन्हा सहा प्रशासकीय प्रस्ताव आहेत. त्यावर चर्चा करण्यात येणार आहे.

महासभा ऑनलाईन घेण्याबाबत शासनाचे ३ जानेवारी २०२२ चे पत्र होते. त्यानंतर ऑफलाईन सभेचे कोणतेही पत्र नव्हते. त्यामुळे ही सभा ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र बुधवारी (ता. १६) रोजी रात्री उशीरा ऑफलाईन सभेबाबत शासनाचे पत्र प्राप्त झाले, त्यानुसार आता २४ मार्चची सभा ऑफलाईन होणार आहे. त्याबाबत सदस्यांना दुरुस्ती पत्रे पाठविण्यात येतील.

- सुनील गोराणे नगर सचिव, जळगाव महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT