News reporter Deepali Kelkar doing a revealing interview with lyricist Babasaheb Saudagar. Neighbor Sandeep Ghorpade. esakal
जळगाव

Jalgaon News: भलेपणाच्या उपकाराचे कसे मानू आभार..? गीतकार बाबासाहेब सौदागर यांनी प्रकट मुलाखतीत उलगडला जीवनप्रवास

९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात झालेल्या प्रकट मुलाखतीत सौदागर म्हणाले, की चालता-बोलता, सहजच अनेक गाणी लिहिली आहेत.

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर : ‘भलेपणाच्या उपकाराचे कसे मानू तुमचे मी आभार.? दरवळणाऱ्या चंद्रफुलांच्या आभाळाला झाला भार... कुठलं नातं तुमचं आणि आमचं, जिव्हाळ्याचं की रक्ताचं..? असेल तेही कुठल्या जन्मी देव अन भक्ताचं... अंधारातून दिसतो वाटा तया तुझा आधार...’ या काव्यपंक्तींच्या माध्यमातून ऋणनिर्देश करीत गीतकार बाबासाहेब सौदागर (श्रीरामपूर) यांनी आपल्या विविध गीतांच्या माध्यमातून प्रेक्षकांना खिळवून ठेवत आपला जीवनप्रवास उलगडला.

वृत्त निवेदिका दीपाली केळकर (बदलापूर) यांनी प्रकट मुलाखत घेतली. (Lyricist Babasaheb Saudagar revealed his life journey in revealing interview in 97 akhil bharatiya marathi sahitya sammelan Jalgaon News)

येथे सुरू असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात झालेल्या प्रकट मुलाखतीत सौदागर म्हणाले, की चालता-बोलता, सहजच अनेक गाणी लिहिली आहेत. ‘भारत देश आमचा महान’ हे देशभक्तिपर गीत केवळ पाच मिनिटांत लिहून दिले.

त्यावेळी उपस्थितांना धक्काच बसला. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत १२ बलुतेदारांची १२ कामे व १८ अलुतेदार यांचा समावेश असणारे गीत अपेक्षित होते, त्या गीताची रचना करून त्या सुंदर नवगीताची निर्मिती झाली.

शेवटच्या कडव्यात ‘हेतू’ हा शब्द असलेले देशभक्तिपर गीत अपेक्षित होते, त्या वेळी अल्पावधीतच गीतनिर्मिती झाली. मराठी वाङ्‍मय मंडळाचे संचालक संदीप घोरपडे यांनी सूत्रसंचालन केले. मराठी वाङ्‍मय मंडळ व खानदेश शिक्षण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Update : अचानक फोनची कॉलिंग स्क्रीन वेगळी दिसतेय? पटकन जाणून घ्या तुमच्या मोबाईलला काय झालंय

Ganeshotsav : ठाणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी, गणेशभक्त तब्बल २५ तास रांगेत उभे, कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळेना

Glycemic Index: मधुमेही खजूर खाऊ शकतात का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Crime News: डोळ्यांदेखत पतीवर चाकूचे १६ वार, मला न्याय द्या! कुटुंबावरील हल्ल्यात खून झालेल्या प्रमोदच्या पत्नीची पोलिसांना विनंती

SCROLL FOR NEXT