Madhya Pradesh In Maharashtra Drug trafficking
Madhya Pradesh In Maharashtra Drug trafficking sakal
जळगाव

जळगाव : मध्य प्रदेशमार्गे महाराष्ट्रात अमली पदार्थांची तस्करी

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : रावेर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात स्थानिक गुन्हे शाखेने अमली पदार्थ (Drug) तस्करीप्रकरणी शनिवारी (ता. १८) ४५ वर्षीय महिलेस ताब्यात घेतले. अख्तरीबानो अब्दुल रऊफ असे तिचे नाव असून, तिच्या ताब्यातून पथकाने अंदाजे एक कोटी आठ हजार रुपयांचे अर्धा किलो हेरॉईन- ब्राऊनशूगर जप्त केली असून, रावेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

जिल्‍हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रावेर शहरात सापळा रचण्यात आला. तहसीलदार उषाराणी देवगुणे, निरीक्षक कैलास नागरे, साहाय्यक निरीक्षक योगिता नारखेडे, शीतलकुमार नाईक, उपनिरीक्षक विशाल सोनवणे, सहाय्यक फौजदार युनूस शेख, सुनील दामोदरे, लक्ष्मण पाटील, किशोर राठोड, रणजित जाधव, ईश्वर पाटील, अभिलाषा मनोरे यांच्यासह रावेर पोलिस ठाण्याच्या पथकाने डॉ. बाबासाहेबर आंबेडकर चौकात सापळा रचून अख्तख्तरी बानो अब्दुल रऊफ खान (वय ४५, रा. मोमीनपुरा, बडा कमेलापास, ता. जि. बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) हिला ताब्यात घेतले.

तिच्याकडे एक कोटी आठ हजारांचे (५०००.०४ ग्रॅम) सुमारे अर्धा किलो हेरॉईनचे दोन पॅकेट आढळून आले. पथकातील फॉरेन्सिक प्रयेागशाळा टीमने जागेवरच नमुने संकलित करून मोबाईलप्रयोग शाळेत शास्त्रीय पृथक्करण केल्यावर अतिसंवेदनशील हेरॉईन- ब्राऊनशूगर असल्याचे प्राथमिक तपासणीत निष्पन्न झाले आहे. संशयित महिलेस ताब्यात घेत रात्री उशिरापर्यंत रावेर पोलिस ठाण्यात अमली पदार्थविरोधी अधिनियम (NDPS) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी सांगितले.

मंदसौरच्या साथीदाराचे नाव अख्तरीबानो अब्दुल रऊफ या महिलेची चौकशी केल्यावर तिने जप्त हेरॉईन- ब्राऊनशूगरचे पॅकेट मंदसौर (ता. मध्य प्रदेश) येथील सलीम खानशेर बहादूर खान(रा. कटियानी कॉलनी, मंदसौर, मध्य प्रदेश) याच्याकडून घेतल्याची माहिती पोलिस पथकाला दिली असून, संशयित महिलेसह पथक मध्य प्रदेशात दाखल झाले असून, संशयित सलीम खान याचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले.

‘कार्डिलिया क्रूज’ पेक्षा जास्त साठा

प्रामुख्याने थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर रईसजाद्यांच्या पार्ट्यांसाठी गुजरात- मुंबईतून समुद्री मार्गाने पाकिस्तान-अफगाणिस्तानातून अफू- चरस, हेरॉईन, ब्राउनशूगर या अमली पदार्थांची मोठ्या प्रमाणावर तस्करी केली जाते. देशभर गाजत असलेल्या ‘कार्डिलिया क्रूज’ पार्टीवरून शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अशाच रॅकेटच्या संशयातून मुंबईच्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB)चे संचालक समीर वानखेडे यांनी अटक केली हेाती. या ‘कार्डिलिया क्रूज’वर मिळालेल्या अमली पदार्थापेक्षा कितीतरी जास्त हेरॉईन- ब्राउनशूगर जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केल्याने जळगाव जिल्‍हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

ब्राउनशूगर की हेरॉइन

गुन्हे शाखेने जप्त केलेली पावडर नेमकी ब्राउनशूगर आहे की हेरॉइन, याची ठोस माहिती अधिकृत शासकीय प्रयोगशाळेत शास्त्रीय पृथक्करण अहवालातून समोर येणार आहे. हेरॉईन हे अतिशुद्ध रूप असून, पांढऱ्या क्रिस्टलाईन पावडर फार्ममध्ये तोळ्यावर त्याची विक्री केली जाते. याच हेरॉईन पावडरमध्ये चॉकलेटी रंगाचा पदार्थ मिश्रित केल्यावर एक ग्रॅम वजनाच्या हेरॉईनपासून चार ग्रॅम ब्राउनशूगर तयार केली जाते. प्रथमदर्शनी जप्त अमली पदार्थ हेरॉईन असण्याची दाट शक्यता पथकातील तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Atala Masjid: भिंतीवर त्रिशूळ, फुले? जौनपूरमधील अटाला मंदीर की मशीद? हिंदुंनी गाठलं कोर्ट, काय आहे संपूर्ण प्रकरण

Chhagan Bhujbal: "काँग्रेस मला मुख्यमंत्रीपद देण्यास तयार होती, मात्र मी..."; भुजबळांची शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया

Soni Razdan: आलिया भट्टच्या आईसोबत फसवणुकीचा प्रयत्न; म्हणाल्या, "त्यांनी मला फोन केला आणि..."

RCB vs CSK : आरसीबीपाठोपाठ जिओ सिनेमाचीही बल्ले-बल्ले, मिळाली छप्पर फाड के व्ह्युवरशिप; सगळे रेकॉर्ड ब्रेक

गोफण | 'बिनशर्त'ची सुपारी दणक्यात वाजली!

SCROLL FOR NEXT