Latest Marathi news esakal
जळगाव

चाळीसगावातील मुख्य रस्ता दुरुस्तीचे काम सुरू; नागरिकांना दिलासा

लवकरच तालुक्याच्या विकासकामांसाठी २० कोटींचा निधी मंजूर करून आणणार असल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले.

सकाळ वृत्तसेवा

चाळीसगाव (जि. जळगाव) : शहरातील हॉटेल दयानंद ते खरजई नाक्यासह प्रमुख रस्त्यांच्या दुरुस्तीला आमदार मंगेश चव्हाण यांनी बुधवारपासून सुरूवात केली आहे. लवकरच तालुक्याच्या विकासकामांसाठी २० कोटींचा निधी मंजूर करून आणणार असल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले. (Latest Marathi News)

शहरातील प्रभाग क्रमांक तीनमधील हॉटेल दयानंद ते खरजई नाक्यापर्यंत भुयारी गटारींमुळे रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. याबाबत नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत होता. आमदार चव्हाण यांना ही गंभीर बाब लक्षात येताच त्यांनी हॉटेल दयानंद ते खरजई नाकासह प्रमुख रस्त्याची मुरूम व खडी टाकून स्वखर्चाने दुरूस्ती सुरू केली आहे. तत्पूर्वी राज्यात सत्ता बदल झाल्याने शहरासाठी भरीव निधी आणण्यासाठी आमदार मंगेश चव्हाण यांनी प्रयत्न सुरू केले आहे. लवकरच तालुक्याच्या विविध विकासकामांसाठी २० कोटींचा निधी मंजूर करून आणणार असल्याचे आमदार चव्हाण यांनी ‘सकाळ'शी बोलताना व्यक्त केले आहे.

त्यापैकी पहिल्या टप्प्यात ५ कोटींचा निधी उपलब्ध होणार असून, लवकरच कामास प्रारंभ होणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले आहे. या आधीही त्यांनी स्वखर्चाने शहरातील स्टेशन रोड, गणेश रोड, करगाव रोड दुरुस्ती केली होती. तसेच पावसाळा संपल्यानंतर आमदार निधी व नगरपालिका निधीतून रस्त्यांचे डांबरीकरण देखील केले होते.

कामाच्या उदघाटनप्रसंगी आमदार चव्हाण यांच्यासह ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र चौधरी, भाजप शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, नगरपालिका गटनेते संजय पाटील, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील, नगरसेवक नितीन पाटील, चंद्रकांत तायडे, माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी, भास्कर पाटील, सदानंद चौधरी, रणजीत पाटील, हर्षल चौधरी, जितेंद्र वाघ, योगेश खंडेलवाल, कैलास नाना पाटील, अभय वाघ, देवा गांगुर्डे, मनोज गोसावी, बंडू पगार, अग्गा सय्यद, अकलाक खाटिक, धीरज पवार, मयूर घोरपडे, विकी देशमुख, विपुल पाटील यांच्यासह प्रभाग क्रमांक तीनमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT