bribe esakal
जळगाव

Jalgaon : रेशनकार्डसाठी लाच घेणारा खासगी पंटर गजाआड

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जुने व जीर्ण झालेले रेशनकार्ड नवीन बनवून देण्यासाठी ४०० रुपयांची लाच घेणाऱ्या खासगी तरुणाला लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली. लाचखोरीच्या या साखळीतील मोठा मासा मात्र नेहमी प्रमाण अलगद निसटला आहे.

भोलाणे (ता. जळगाव) येथील २८ वर्षीय महिलेचे रेशनकार्ड जुने व जीर्ण झाल्याने नव्याने दुय्यम नवीन प्रत मिळण्यासाठी जळगाव तहसील कार्यालयात अर्ज घेऊन तक्रारदार गेले होते. त्याठिकाणी खासगी व्यक्ती पराग पुरुषोत्तम सोनवणे (वय-३९ रा. खोटे नगर, जळगाव) याने रेशनकार्डची दुय्यम प्रत हवी असेल तर ४०० रुपयांची मागणी केली. तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागात या बाबत रीतसर लेखी तक्रार केली. पोलिस उपअधिक्षक शशिकांत पाटील यांच्या पथकाने तक्रारीची खात्री केल्यावर निरीक्षक एन. एन. जाधव, निरीक्षक संजोग बच्छाव, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, अशोक अहिरे, सुनील पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर, मनोज जोशी, जनार्दन चौधरी, सुनील शिरसाट, प्रवीण पाटील, महेश सोमवंशी, नासिर देशमुख, ईश्वर धनगर, प्रदीप पोळ आदींच्या पथकाने सापळा रचून संशयित खासगी पंटर पराग सोनवणे याला ४०० रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : राज्यात विजांसह पावसाची शक्यता; पुढील ५ दिवसांचा हवामान अंदाज

Parag Shah: ३३८३ कोटींचे आमदार रस्त्यावर उतरले; भिक्षेकऱ्याचा वेश करून मागितली भिक्षा, नेमकं कारण काय?

IMD Weather Update: मॉन्सून शनिवारपासून परतीच्या मार्गावर : ‘आयएमडी’ पश्चिम राजस्थानातून घेणार माघार

Maharashtra Police Recruitment: पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! राज्यात ८१०० पदांसाठी नववर्षात भरती; सोलापुरात ११७ जागा

जीवनमान-जीवनभान : व्यायामाने जपूया मानसिक आरोग्य

SCROLL FOR NEXT