Snake bite esakal
जळगाव

ऐकाव ते नवलच...! पठ्ठ्याला तब्बल 13 वेळा झालाय सर्पदंश

आज आम्ही जे तुम्हाला सांगणार आहोत ते वाचून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

सकाळ वृत्तसेवा

यावल : तुम्ही आतापर्यंत एखाद्या व्यक्ती एक, दोन किंवा फार तर तीन वेळा सर्पदंश झाल्याची ऐकले, पाहिले किंवा वाचले असेल परंतु आज आम्ही जे तुम्हाला सांगणार आहोत ते वाचून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. एकाच व्यक्तीला तब्बल तेरा वेळा सर्पदंश झाला आहे. तालुक्यातील दहिगाव येथील ४० वर्षीय व्यक्तीला तब्बल तेराव्यांदा सर्पदंश झाला आहे. बुधवारी (ता. २५) ते गावातील मागासवर्गीय वस्तीत काम करत असताना त्यांना सापाने चावा घेतला. तर यापूर्वी त्यांना सापाने १२ वेळा दंश केला असून ही १३ वी वेळ आहे. २०१७ मध्ये सात महिन्यात त्यांना १० वेळा सर्पदंश झाला होता. आता पुन्हा साप आपला पिच्छा करेल की काय, अशी भीती त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना वाटत आहे. (snake bite 13 times)

हा नागिनचा बदला तर नसावा...

दहिगाव (ता. यावल) येथील रहिवासी गणेश देविदास मिस्तरी (सुतार) या व्यक्तीला बुधवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास सर्पदंश झाला. लघुशंकेकरीता तेथील सार्वजनिक शौचालयात गेले असताना सापाने दंश केला. सदर प्रकार लक्षात येताच त्यांना तातडीने यावल ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. बी. बारेला, अधिपरिचारीका शितल ठोंबरे, संजय जेधे, बापू महाजन यांनी उपचार केले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. गणेश यांना यापूर्वी एप्रिल २०१७ ते ऑक्टोंबर २०१७ सात महिन्याच्या काळात तब्बल १० वेळा सर्पदंश झाला होता. तेव्हा देखील गावासह तालुक्यात मिस्तरींवर सापाचा डावतर नाही, नागिनचा बदला तर नसावा, अशा विविध चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, नंतर हा प्रकार थांबला. गेल्या डिसेंबरमध्ये त्यांना सर्पदंश झाला. आता पुन्हा त्यांना बुधवारी सर्पदंश झाल्याने २०१७ ची पुनर्रावृत्ती होईल की काय, अशी भीती कुटुंबाकडून व्यक्त होत आहे.

असा झाला सर्पदंश...

७ डिसेंबर २०१६ केळीच्या बागेत.
१७ एप्रिल २०१७ घराजवळील लाकूड उचलताना.
१२ मे २०१७ घराबाहेरील सफाई करताना.
२५ मे २०१७ शौचास जाताना.
१४ जून २०१७ घराबाहेरील माठातून पाणी पिताना.
२६ ऑगस्ट २०१७ घराबाहेरी लाकूड उचलताना.
१४ सप्टेंबर २०१७ शौचास जाताना.
१९ सप्टेंबर २०१७ घराच्या बाहेर.
२८ सप्टेंबर २०१७ घरातील बाथरूमजवळ.
१२ ऑक्टोंबर २०१७ घराबाहेर काम करताना.
२७ ऑक्टोंबर २०१७ घरात बाहेर साफसफाई करताना.
२२ डिसेंबर २०२१ गावातील पटेल वाड्यात काम करताना.
२५ मे २०२२ गावातील मागसवर्गीय वस्तीत काम करताना.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Level : कोयना धरण निम्म्याहून अधिक भरलं! पण 100 टक्के भरण्यासाठी अजून किती टीएमसी पाण्याची गरज? पाहा लेटेस्ट अपडेट

IND vs ENG Weather Update: भारत-इंग्लंड शेवटच्या टी२० सामन्यात पावसाचा धुमाकूळ की होणार पूर्ण खेळ? हवामान खात्याने दिला 'हा' इशारा...

Latest Marathi News Live Update : येरवडा गणेश नगर परिसरात दोन गटांतील मुलींमध्ये जोरदार हाणामारी

Hingoli: माळसेलूत चिखल तुडवत विद्यार्थी शाळेत ; रस्त्याची दुरवस्था; पालकांत तीव्र संताप; आरोग्याचा प्रश्नही गंभीर, ग्रामपंचायतीचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष

Maharashtra ATS Raids : पाकिस्तानी गुंडांशी सोशल मीडिया कनेक्शन! कोल्हापूरच्या 2 तरुणांची 10 तास कसून चौकशी; 'एटीएस'कडून राज्यभरात 112 तरुणांची झाडाझडती

SCROLL FOR NEXT