A couple worshiping Mangal Akshata during the Pran Pratishtha ceremony of Shri Ram Temple in Ayodhya.  esakal
जळगाव

Jalgaon News: अयोध्येतील मंगल अक्षता जळगावात घरोघरी वाटणार; 101 जोडप्यांकडून विधिवत पूजन

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News: अनेक वर्षांच्या संघर्षानंतर अयोध्येत प्रभू श्रीरामलाल्ला जन्मस्थळी २२ जानेवारीस विराजमान होणार आहेत. या ऐतिहासिक क्षणानिमित्त अयोध्येतून मंगल अक्षता पूजाविधी करून जळगावमध्ये दाखल झाल्या असून, अक्षतांचे १०१ जोडप्यांच्या हस्ते अकराकुंडी हवन यज्ञ मांडून पूजन झाले.

संपूर्ण जिल्ह्यात अक्षतांचे कलशवाटप केले गेले. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुका प्रतिनिधींना मान्यवरांच्या हस्ते कलश सोपविण्यात आले. (Mangal Akshatha from Ayodhya will be shared from house to house in Jalgaon news)

२२ जानेवारीस होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे भव्यदिव्य नियोजन करण्याचे तसेच घरोघरी हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा व्हावा, गल्लोगल्ली दारोदारी प्रत्येक मठ-मंदिरात या उत्सवाचे फलक एलसीडी प्रोजेक्टर तसेच मोठ्या प्रमाणात दिवाळीसारखा हा उत्सव साजरा व्हावा, यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन ललित चौधरी यांनी केले आहे.

पूजनासाठी सर्व सकल हिंदू समाजातील विविध यजमान उपस्थित होते. जैन संघाचे अशोक जैन, आमदार राजूमामा भोळे, केमिस्ट असोसिएशनचे सुनील भंगाळे, डॉ. वैभव व डॉ. केतकी पाटील, अनिल अडकमोल, तृतीयपंथी समाजाचे पूनम जान व त्यांचे सहकारी तसेच विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष हरिश मुंदडा, जिल्हामंत्री देवेंद्र भावसार, जिल्हा सहमंत्री राजेंद्र गांगुर्डे, विभाग संयोजक राकेश लोहार, श्रीराम बारी, प्रसिद्धीप्रमुख भूषण क्षत्रिय, जिल्हा संयोजक अतुल पाटील, सहसंयोजक समाधान पाटील यांच्यासह अनेक प्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते.

अशी आहे रचना

या अक्षदांसोबतच घरोघरी श्रीरामलल्लांची प्रतिमा देऊन कार्यक्रमासाठी आमंत्रण दिले जाणार आहे. रचनेनुसार शहरातील अकरा भागांच्या प्रतिनिधींना मान्यवरांच्या हस्ते कलश सोपवण्यात आले आहेत.

शहर व संपूर्ण जिल्ह्यात या अक्षता घरोघरी पोचविण्यासाठी विश्व हिंदू परिषदेतर्फे संपूर्ण रचना तयार करण्यात आली आहे. मंगल अक्षतांचे पौरोहित्य गायत्री परिवाराचे भक्तिप्रसाद मुंदडा, हरिभाऊ व त्यांचे सहकाऱ्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Pune Kondhwa Rape Case : पुणे 'कुरियर बॉय' बलात्कार प्रकरण; आरोपीस अटक अन् धक्कादायक माहितीही उघड!

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

Ulhasnagar Crime : दारू पार्टीतील किरकोळ वादातून मित्राकडून मित्राचा खून; आरोपी शकील शेखला बेड्या

SCROLL FOR NEXT