Speaking at a public meeting held here on Sunday, Manoj Jarange Patil, in front of the crowd. esakal
जळगाव

Manoj Jarange Patil Jalgaon : कुणबी- ओबीसींना एकजुटीचे आवाहन : मनोज जरांगे पाटील

सकाळ वृत्तसेवा

Manoj Jarange Patil Jalgaon : आरक्षण असलेल्या खानदेशातील कुणबी- ओबीसी बांधवांनो, राज्यातील तमाम मराठी बांधवांना तुमच्या पाठबळाची गरज आहे. तुम्हाला आरक्षण आहे म्हणून थंड बसू नका, मराठ्यांचे लेकरू वेदनेने त्रासतेय, आपले रक्त एक आहे, आपली पोरे आणि आपली जात जगली पाहिजे यासाठी एकजूट ठेवा असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी येथील सानेगुरुजी विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या जाहीर सभेत केले.(Manoj Jarange Patil appeal of Unity to Kunbi OBC to Marathi brothers jalgaon news)

‘राजकीय स्वार्थासाठीपोटी एक नेता जातीय भांडणे लावण्याचे काम करीत आहे. आमच्या मनात पाप राहिले असते तर काहींच्या काही झाले असते. येवल्याचा हा पहिला मंत्री आहे, जो महापुरुषांची जात काढतो. मी तुमच्या बळावर लढतो, त्याला पाहण्यासाठी मी खंबीर आहे.

माझ्या समाजाला संपवण्यासाठी षडयंत्र रचले आहे, मात्र मराठ्यांचे स्वप्न आहे, काहीही झाले तरी आरक्षण मिळवायचे आहे. एका नोंदीवर २०० प्रमाणे २ कोटी मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे.

मला डॉक्टरांनी दोन महिने आराम करायला सांगितला आहे. पण मेलो तरी चालेल, मराठ्यांना ओबीसी आरक्षण घेणारच फक्त शांततेने आंदोलन करा असे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले.

तत्पूर्वी जेसीबीच्या साहाय्याने त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. मंत्री अनिल पाटील यांच्या वहिनी राजश्री पाटील यांनी अण्णाभाऊ साठे चौकात औक्षण केले. सभेच्या ठिकाणी महिलांनी औक्षण करून समाजाच्या कार्यकर्त्यांनी विठ्ठलाची मूर्ती देऊन सत्कार केला.

सभेला माजी आमदार साहेबराव पाटील, माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, समाजाचे तालुकाध्यक्ष जयवंतराव पाटील, तिलोत्तमा पाटील आदींसह सुमारे सात ते आठ हजार कुणबी मराठा समाजबांधव हजर होते. संजय पाटील यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT