MP- MSRTC-ST-Bus
MP- MSRTC-ST-Bus 
जळगाव

सव्वा वर्ष झाली तरी..महाराष्ट्र-मध्यप्रदेशची एसटी सेवा बंदच

दिलीप वैद्य

महाराष्ट्राच्या या बस गाड्या मध्यप्रदेशमध्ये जितके किलोमीटर धावतील तितके किलोमीटर अंतर मध्यप्रदेशच्या गाड्या महाराष्ट्रात धावतील असा या दोन राज्यांचा करार आहे.


रावेर ः गेल्या सव्वा वर्षापासून रावेर-बऱ्हाणपूर ही एसटी बस सेवा (ST bus service) बंद असून मध्यप्रदेश राज्य सरकारने (Madhya Pradesh State Government) घेतलेल्या अडवणुकीच्या धोरणामुळे ती पुन्हा लवकर सुरू होण्याची शक्यता नाही. यामुळे या मार्गावरील सुमारे पाच ते सात हजार प्रवाशांची ने-आण सध्या बंद असून त्यामुळे रावेर एसटी आगाराचे सुमारे १ लाख रुपयांचे रोज नुकसान होत आहे. विशेष म्हणजे एसटीने प्रवाशांची ने-आण करण्याला विरोध करणाऱ्या मध्य प्रदेश सरकारने खासगी ट्रॅव्हल्स (Private Travels) बसद्वारे होणाऱ्या प्रवाशांच्या वाहतुकीकडे मात्र सोयिस्कररित्या दुर्लक्ष केले आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, रावेर (महाराष्ट्र) आणि बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) या दोन शहरात सुमारे २५ किलोमीटरचे अंतर आहे. रावेर पासून १४ किलोमीटर अंतरावर चोरवड नजीक महाराष्ट्राची हद्द असून तेथून पुढे ११ किलोमीटरवर बऱ्हाणपूर हे शहर आहे. सकाळी ६ ते रात्री ८ पर्यंत रावेर आगाराच्या रावेर-बऱ्हाणपुर, शिर्डी- बऱ्हाणपूर, नाशिक-बऱ्हाणपूर, जळगाव-बऱ्हाणपूर, औरंगाबाद-बऱ्हाणपूर अशा सुमारे ७८ फेऱ्या दर अर्धा तासाने जात येत होत्या. महाराष्ट्राच्या या बस गाड्या मध्यप्रदेशमध्ये जितके किलोमीटर धावतील तितके किलोमीटर अंतर मध्यप्रदेशच्या गाड्या महाराष्ट्रात धावतील असा या दोन राज्यांचा करार आहे.

MSRTC-ST-Bus

लाॅकडाऊन पासून वाहतूक बंद

त्यानुसार सुमारे ७० फेऱ्या मध्यप्रदेशच्या महाराष्ट्रात सुरू होत्या. या सर्व फेऱ्या मधून सुमारे ५ ते ७ हजार प्रवाशांची ने-आण रोज होत होती. तसेच या मार्गावर सुमारे ५० ते ६० जीप गाड्या आणि ओमनी मारुती व्हॅन या खासगी वाहनातून ही प्रवाशांची वाहतूक होत होती. मे २०२० पासूनच्या लॉकडाऊन पासून ही प्रवासी वाहतूक बंद आहे. आता कोरोनाचे प्रमाण कमी होऊन देखील मध्यप्रदेश सरकारने घेतलेल्या अडवणुकीच्या धोरणामुळे एसटी महामंडळाच्या बस गाड्या मध्यप्रदेश हद्दीत येऊ दिल्या जात नाहीत. याउलट खासगी जीप गाड्या आणि ओमनी मारुती गाड्यांमधून प्रवाशांची वाहतूक सुरू आहे. अर्थात या सर्वच खाजगी वाहनातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोरोनाची अँटीजेन किंवा आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल दाखवून मगच प्रवेश दिला जात आहे.

परवानगी देण्यास मध्यप्रदेश सरकार नकार

मागील पंधरवड्यात रावेर एसटी आगाराचे कामगार संघटनेचे ज्येष्ठ पदाधिकारी जे जी पाटील आणि श्री जंजाळकर यांनी बऱ्हाणपूर येथे जाऊन तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि जिल्हाधिकार्‍यांना विनंती करूनही एसटीची वाहतूक सुरु करण्यास तेथील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेली नाही. येथील काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि मुंजलवाडी येथील सरपंच योगेश पाटील यांनी तेथील आमदार शेरसिंह ठाकूर यांची भेट घेऊन त्यांना विनंती केली आहे. मात्र या आंतरराज्य प्रवासी वाहतुकीस मध्यप्रदेश सरकार परवानगी देत नाही.

खासगी प्रवासी वाहतूक सर्रास..
दरम्यान, जळगाव,भुसावळ व अन्य ठिकाणाहून इंदोरकडे व मध्यप्रदेशात जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स गाड्या मात्र खरगोन आणि अंतुर्ली मार्गे मध्यप्रदेश मध्ये सर्रास जात आहेत. या खासगी ट्रॅव्हल्स मधील प्रवाशांची मात्र कोणतीही कोरोना तपासणी केलेली नसली तरी त्यांना मध्य प्रदेशात प्रवेश दिला जात आहे. मध्यप्रदेशच्या लोणी नाक्यावर वेगळा नियम आणि अंतुर्ली, खरगोनकडे जाणाऱ्या नाक्यावर वेगळा नियम मध्यप्रदेश सरकार लावत आहे.एस टी द्वारे ही आंतरराज्य वाहतूक तातडीने सुरू करावी अशी प्रवाशांची मागणी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

मोठी बातमी! बारावीचा 25 मे तर दहावीचा निकाल 5 जूनपूर्वी; विद्यार्थ्यांची जुलैमध्ये पुरवणी परीक्षा; बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात असा होईल बदल

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

SCROLL FOR NEXT