cotton seeds sakal
जळगाव

कृषी विभागाची धाड; बोगस बियाणे विकणाऱ्यावर गुन्हा दाखल

कृषी विभागाची धाड; बोगस बियाणे विकणाऱ्यावर गुन्हा दाखल

सकाळ डिजिटल टीम

अमळनेर (जळगाव) : गुजरात येथील बोगस बियाणे (cotton seeds) आणून विक्री करणाऱ्या श्रीकृष्ण ऍग्रो व इरिगेशन दुकानदाराला कृषी विभागाच्या (agriculture department) अधिकाऱ्यांनी छापा टाकून रंगेहाथ पकडले. तसेच बियाणे अधिनियम व पर्यावरण संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (agriculture department action duplicate cotton seeds)

जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरूण तायडे तसेच भरारी पथकातील कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे, तालुका कृषी अधिकारी भारत वारे, मोहीम अधिकारी प्रकाश महाजन, कृषी विस्तार अधिकारी अमोल भदाणे यांनी कारंजा चौकातील श्रीकृष्ण ऍग्रो व इरिगेशन या दुकानांवर नियमित निविष्ठा केंद्रांची तपासणी करायला गेले. मालक जितेंद्र दिनकर पाटील हा मान्यता नसलेले एचटी. बीटी कापूस बियाणे एक हजार रुपये प्रति मग याप्रमाणे विक्री करत असल्याचे आढळून आले.

तपासणीत आढळले पाच पाकिट

अधिकाऱ्यांनी दुकानाची तपासणी केली असता ठिबक नळ्यांच्या खाली शकीत गोल्ड नावाचे परवाना नसलेल्या बियाण्याचे पाच पाकिटे आढळून आली. या बियाण्याला जीएइसीची मान्यता नसल्याचे स्पष्ट झाले. त्यातील एक पाकिट बीज परीक्षण प्रयोग शाळा नागपूर येथे पाठवण्यात आले असून बाकीचे पाकिटे जप्त करून मालक जितेंद्र पाटील यांच्याविरुद्ध अनधिकृतपणे बियाण्याचा साठा करून विक्री करणे व पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati By Election : सुनेत्रा पवार यांनी बारामती पोटनिवडणुकीसाठी दाखल केला उमेदवारी अर्ज ; अजितदादांच्या आठवणीने डोळ्यांत तरळले अश्रू

CCTV Rules 2026 : काय भारतात लाखो CCTV कॅमेरे सुरक्षित आहेत? Qubo CEO नी दिला हॅकिंगचा इशारा, तुमचा कॅमेरा सेफ आहे का? 'असे' करा चेक

Satara Politics : भाजपची 'अफाट' किमया! संख्याबळ कमी असतानाही साताऱ्यात सत्ता कशी मिळवली? वाचा सविस्तर इनसाईड स्टोरी

राष्ट्रावादीच्या मेळाव्यात बॅनरवर शरद पवारांचा फोटो, तर चाकणकर अनुपस्थित; चर्चांना उधाण

लग्नापाठोपाठ गौरव मोरेने दिली आणखी एक गुड न्यूज ! पवईतील ड्रीम हाऊसमध्ये केला गृहप्रवेश ; नेमप्लेट चर्चेत

SCROLL FOR NEXT