amalner stone door amalner stone door
जळगाव

ऐतिहासिक दगडी दरवाज्याला निषेधचा फलक, काळे झेंडे

ऐतिहासिक दगडी दरवाज्याला निषेधचा फलक, काळे झेंडे

सकाळ डिजिटल टीम

अमळनेर (जळगाव) : येथील ऐतिहासिक दगडी दरवाजाच्या दुरुस्तीच्या काम रेंगाळल्यामुळे आज चक्क दगडी दरवाज्याला "निषेधचा फलक" लावून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. विशेष म्हणजे दगडी दरवाजा पासून ते पानखिडकी पर्यत दुकानांना काळे झेंडे लावून निषेध आंदोलन करण्यात आले. (amalner-city-Protest-plaque-on-the-historic-stone-door-black-flags)

दगडी दरवाजाच्या दुरुस्तीच्या कामाला वेग मिळावा यासाठी दबाव गट निर्माण करणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर आज झालेल्या विशेष बैठकीत दगडी दरवाजा पुनर्निर्माण समितीची घोषणा करण्यात आली. यावेळी जेष्ठ सदस्य मुकुंद विसपुते, पालिकेचे विरोधी पक्ष गटनेते प्रवीण पाठक, माजी उपनगराध्यक्ष गोपीभाऊ कासार, प्रा.जयश्री दाभाडे, राजेंद्र पोतदार, बाळासाहेब संदानशिव, नाविदभाई शेख, पंकज भावसार, अक्षय अग्रवाल,पराग चौधरी, जिल्हा नियोजन समिती चे माजी सदस्य पंकज चौधरी आदीं उपस्थित होते. यावेळी आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली. यानुसार पानखिडकी ते दगडी दरवाजापर्यँत दुकानावर व घरांवर काळे झेंडे लावून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. समितीच्‍या कार्यात इच्छुक सदस्यांनी स्वतःहून सहभागी व्हावे असे आवाहन बैठकीत करण्यात आले.

असे होणार आंदोलन

शुक्रवारी (ता.१८) व्यापारी बांधव व जास्तीत जास्त नागरिकांनी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करणे.

शनिवारी (ता.१९) दगडी दरवाजा जवळ सकाळी ९ ते १२ पर्यत घंटानाद व थाळीनाद आंदोलन.

रविवारी (ता.२०) बैठक व चर्चा करून आंदोलनाचा आढावा घेणे.

सोमवारी (ता.२१) इच्छापूर्ती देवी मंदिर, पानखिडकी येथे आरती करून ढोल वाजवत पालिकेत जाऊन नगराध्यक्ष यांना स्मरणपत्र व नगराध्यक्ष यांचा निवासस्थानकाच्या बाहेर ढोल वाजवणे. दरम्यान खासदार, आमदार, नगराध्यक्ष, जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना निवेदन पाठवणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT