awareness about corona 
जळगाव

सहा महिन्‍यांपासून कुटुंबापासून दूर..नागरीकांसाठी करतोय सायकलवर भ्रमंती

राजु कवडीवाले

यावल (जळगाव) : कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी राज्य शासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यात नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ हे जनजागृती अभियानही सुरू केले असून, याच कार्यक्रमांतर्गत कोल्हापूरच्या एका धाडसी तरुणाने सायकलीवर फिरून जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. त्याने अर्ध्याहून अधिक महाराष्ट्र पिंजून काढला आहे. नितीन गणपत नावनुरकर (वय ३९, रा. आंबोळी, जि. कोल्हापूर) असे या तरुणाचे नाव आहे. 
सायकल भ्रमंतीवर असलेल्या नितीन नावनुरकर याचे येथे तहसील कार्यालयातर्फे निवासी नायब तहसीलदार आर. के. पवार, मुक्तार तडवी, संतोष पाटील यांनी स्वागत केले. या वेळी नितीन म्हणाला, की आपण १ ऑक्टोबर २०२० पासून कोरोना संकटातून नागरिकांना सुरक्षित करण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या कार्यक्रमांतर्गत सायकलवर फिरून जनजागृती करीत आहे. मास्क लावा, सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करा, असे आवाहन नागरिकांना करीत आहे. 

सहा महिन्‍यात येथून केला प्रवास
तरुणाने सहा महिन्यांच्या कालावधीत कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, लातूर, नगर, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, वर्धा, अमरावती, अकोला, बुलडाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार अशा २९ जिल्ह्यांचा सायकलीद्वारे १३ हजार ५०० किलोमीटरचा प्रवास केला आहे. सुमारे सहा महिन्यांपासून हा तरुण आपल्या कुटुंबापासून केवळ राज्यातील नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचा विधायक दृष्टिकोन समोर ठेवून कोरोना विषाणू संसर्गापासून सावध करण्यासाठी जिद्दीने जनजागृती करीत आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur News: भारताच्या दणदणीत विजयानंतर सोलापुरात जल्लोष; पाकिस्‍तानला लाेळविताच आतषबाजी, पेढे वाटून, तिरंगा उंचावून आनंदोत्सव साजरा!

US Iran Tensions : अमेरिका कधीही सुरु करु शकते युद्ध, सैन्य तैनात करणे फक्त इशारा नाही, इराणला कोणी केले सावध ?

IND vs PAK : प्लॅन फसला! पराभवानंतर पाकिस्तानच्या कॅप्टननं स्पिनर्सवर फोडलं खापर; म्हणाला, चुकांची किंमत मोजली

मुलुंड दुर्घटनेनंतर MMRDAने घेतली धास्ती, ताकही फुंकून पिणार; मेट्रो-४ मार्गिकेबाबत मोठा निर्णय

Construction Worker Scam: बीडमध्ये तीन हजार द्या अन् बांधकाम कामगार बना; कष्टकऱ्यांच्या घामावर डल्ला, बोगस नोंदी, कोट्यवधींच्या निधीवर दरोडा!

SCROLL FOR NEXT