beaten a farmer 
जळगाव

टरबूजचे पैसे मागितले म्‍हणून शेतकऱ्याला मारहाण; मुलीचाही केला विनयभंग 

रईस शेख

जळगाव : नशिराबाद- सुनसगाव रस्त्यावर कलिंगड (टरबूज) विक्री करणाऱ्या शेतकऱ्याला कारमधून आलेल्या चौघांनी बेदम मारहाण केली. त्यापैकी एकाने शेतकऱ्याच्या मुलीचा विनयभंग करून ठार मारण्याची धमकी देत तेथून पळ काढला. शेतकऱ्याने टरबुजाचे पैसे मागितल्याने ही घटना घडली. दरम्यान, ग्रामस्थ शेतकऱ्यांनी पाठलाग करून चौघांची ओळख पटविली असून, संशयित चौघे वाळू व्यावसायिक असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी नशिराबाद पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
नशिराबाद येथील पन्नास वर्षीय शेतकऱ्याचे शेत आहे. सोबतच मामाची शेतजमीनही निम्मेबटाईने हे कुटुंब कसत आहे. त्यांनी शेतात टरबुजाची लागवड केली होती. पहिल्या प्रतिचा माल व्यापाऱ्यांना ठोकभावात दिल्यानंतर दुय्यम माल शेताबाहेरच रस्त्यावर दुकान थाटून रोज विक्री होते. रविवारी (ता. २८) कारमधून आलेले चार जण दुकानावर थांबवले. त्यांनी टरबुजाची पाहणी करून पहिल्या प्रतीचा मोठा टरबूजच हवा, असा हट्ट धरला. मात्र, सर्व माल व्यापाऱ्याला दिला असतानाही शेतकऱ्याने त्यांना टरबूज दिले. चौघांनी साधारण नऊ मोठे टरबूज काढून कारमध्ये ठेवले. फळाच्या दराप्रमाणे आठशे रुपये झाल्याने शेतकऱ्याने पैशांची मागणी केली. मात्र, चौघांनी पैसे न देताच वाद घातला. वादाचे पर्यावसन हाणामारीत होऊन चौघांनी शेतकऱ्याला बेदम मारहाण केली. 

चिमुरडीशी असभ्य वर्तन 
वडिलांना मारहाण होत असल्याचे पाहून शेतकऱ्याच्या अल्पवयीन मुलीने धाव घेतली. वडिलांचा मार वाचविण्याचा प्रयत्न करताना चौघांपैकी एकाने या मुलीशी असभ्य वर्तन करून तिचा विनयभंग केला. पीडितेचा जबाब आणि जखमी शेतकऱ्याच्या तक्रारीवरून बाळू चाटे, विठ्ठल पाटील, सुपडू सोनवणे यांच्यासह एक अशा चौघांवर नशिराबाद पोलिस ठाण्यात बाललैंगिक अत्याचारांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र साळुंखे तपास करीत आहेत. 

संपादन- राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT