bharat band congress
bharat band congress 
जळगाव

भारत बंदला संमिश्र प्रतिसाद; शेतकरी विरोधी कायदे रद्दची मागणी 

सकाळवृत्तसेवा

जळगाव : केंद्रातील भारतीय जनता पक्षाने लादलेल्या शेतकरी विरोधी तीन काळ्या कृषी कायद्यांविरोधात तसेच महागाईच्या मुद्यांवर केंद्रातील मोदी सरकारला जागे करण्यासाठी शेतकरी संघटनांनी आज मार्चला भारत बंद पुकारला होता. त्याला संमिश्र प्रतिसाद मिळाला. विविध संघटनांनी केंद्र शासनाविरूध्द आंदोलन केले. 
आजच्या भारत बंदला काँग्रेस पक्षाने सक्रिय पाठिंबा दिला होता.जळगाव जिल्हा काँग्रेस भवन आवारात कोरोना चे नियम पाळून उपोषण करून पाठिंबा देण्यात आला. 

जिल्हा कॉंग्रेस समिती 
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले यांच्या आदेशानूसार व काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप पाटील यांच्या सूचनेनसार हे आंदोलन करण्यात आले. शहर उपाध्यक्ष शाम तायडे, ब्लॉकअध्यक्ष नईम काझी, तालुकाध्यक्ष मनोज चौधरी, जगदीश गाठे, छायाताई कोरडे, योगीता शुक्ल, अमजद पठाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्र पाटील, क्रांती मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, मंगला पाटील, वाल्मीक पाटील, उज्वल पाटील, फारूक शेख आदींनी सहभाग घेतला. केंद्रातील भारतीय जनता पक्षाने लादलेल्या शेतकरी विरोधी तीन काळ्या कृषी कायद्यांविरोधात देशातील शेतकरी व कामगार दिल्लीच्या सीमांवर मागील १०० दिवसांपेक्षा जास्त दिवस ठाण मांडून बसले आहेत. या केंद्रातील मोदी सरकारला जागे करण्यासाठी हे आंदेालन करण्यात आले. 

ऑल इंडिया ट्रेड युनियन 
येथील ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसतर्फे ‘भारत बंद’आंदोलनाचे पुरवणी निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. शेतकऱ्याच्याविरूध्दचे तीनही कायदे रद्द करा, एमएसपी’ कायदा तयार करा, ग्रामपंचायत, रोजगार सेवक, शालेय पोषण आहार, अंगणवाडी आदी घटकांना एकवीस हजार रूपये पगार द्या, साठ वर्षानंतर पाच हजार रूपये पेन्शन द्या, विज कायदा रद्द करा आदी मागण्या करण्यात आल्या. संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अमृतराव महाजन, देविदास पाटील, सत्तार गुलशेर तडवी, जे.डी.ठाकरे, राजेंद्र खरे आदींनी निवेदन दिले. भाकप व आयटक संपात सहभागी असल्याचे कळविण्यात आले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

काँग्रेसच्या प्रयत्नांवर वडेट्टीवारांनी पाणी फेरले, निवडणूक संपेपर्यंत शांत बसण्याचे निर्देश

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. अजित पवार, उदयनराजे भोसले यांनी केलं मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

Sakal Podcast : मावळ लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार? ते सुनीता विल्यम्सची पुन्हा अवकाश भरारी

SCROLL FOR NEXT