Accident sakal
जळगाव

ट्रकचे चाक अचानक निघून धडकले; युवकाचा मृत्‍यू

ट्रकचे चाक अचानक निघून धडकले; युवकाचा मृत्‍यू

सकाळ डिजिटल टीम

भुसावळ (जळगाव) : साकेगावजवळ महामार्गावर (National highway) धावत्या ट्रकचे चाक अचानक निखळून समोरून येत असलेल्‍या दुचाकीला जोरदार (Accident) धडकले. यात दुचाकीस्वाराचा मृत्‍यू झाला. सदर घटना दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. (bhuasawal highway truck accident one death)

भुसावळकडून जळगावकडे येणाऱ्या सिमेंटने भरलेला ट्रक (क्र. एमएच. १५. एफव्ही. ९९९४) चे मागचे टायर अचानक निघाले. यामुळे ट्रक चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. सदर घटना राष्ट्रीय महामार्गावरील साकेगावजवळ दुपारी घडली. अपघातात एका युवकाला जीव गमवावा लागला. घटना पाहणाऱ्यांच्या हृदयाचा ठोकाच चुकला.

अन्‌ ट्रकचे चाक दुचाकीवर

दुचाकीने साकेगावकडून भुसावळकडे जात असताना बादल गोकुळ पवार (रा. साकेगाव, ता.भुसावळ) याच्या दुचाकीवर ट्रकचे निघालेले चाक धडकले. अचानक घडलेल्‍या या प्रकारामुळे तरूणाला देखील गाडीवर नियंत्रण मिळविता आले नाही. ट्रकचे चाक धडकल्‍याने तरूण गंभीर जखमी झाला होता. यानंतर त्‍यास जखमी अवस्‍थेत तातडीने खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना काही वेळातच त्याचे निधन झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे १३ दिवसांपासून निर्यात बंद; जेएनपीए बंदरात कंटेनर अडकले, शिपिंग कंपन्यांवर खंडणीचा आरोप, प्रकरण काय?

काही चुकलं असेल तर मोठ्या मनाने माफ करा... स्टार प्रवाहच्या लोकप्रिय मालिकेतून अभिनेत्रीची एक्झिट; म्हणते-

Oscars 2026 Goodie Bag: बाबो! ऑस्कर जिंकलं नाही तरी नॉमिनींना मिळाली 3.23 कोटींची बॅग, आत नक्की आहे तरी काय?

Jannat Zubair: धक्कादायक! पनवेलमध्ये जन्नत जुबैर आणि तिचा भाऊ अयान जुबैरवर हल्ला; नेमकं काय घडलं?

Latest Marathi Update : नाशिकच्या म्हाडा घोटाळा प्रकरणात पहिली अटक, सोनू मनवाणीला पोलिसांनी घेतल ताब्यात

SCROLL FOR NEXT